भालचंद्र मुणगेकर

भारतीय अर्थशास्त्रज्ञ

डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर ( २ मार्च इ.स. १९४६) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाज सेवक, शिक्षक आणि राज्यसभा सदस्य आहेत.[] ते कृषी अर्थशास्त्र विषयात उत्कृष्ठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोकण परिसरातील मुंगेज गावातील एका बौद्ध कुटुंबात झाला.[] पुढे त्यांच्या कुटुंबाने व त्यांनी नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ते मुंबई विद्यापीठचे कुलगुरू होते आणि त्यांनी भारतीय कृषी मूल्य आयोग नियोजन आयोगामध्ये काम केले आहे. मुणगेकर हे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीचे अध्यक्षही आहेत.

भालचंद्र मुणगेकर
जन्म २ मार्च, १९४६ (1946-03-02) (वय: ७८)
देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, समाज सेवक, राजकारण
भाषा मराठी
कार्यकाळ शिक्षण काळापासून अद्यापपर्यंत
प्रभाव महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील लक्ष्मण गोपाल मुणगेकर
आई शेवंती लक्ष्मण मुणगेकर
पत्नी लीना भालचंद्र मुणगेकर
अपत्ये १ मुलगा व २ मुली
पुरस्कार मिलिंद समता पुरस्कार (२०१३)[]

पुरस्कार व सन्मान

संपादन
  • मिलिंद समता पुरस्कार (२०१३)[]

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.loksatta.com/vruthanta-news/behaviour-is-related-to-caste-41880/
  2. ^ "संग्रहित प्रत". 2018-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Bal Mungekar's remarkable journey". Rediff. 2018-04-01 रोजी पाहिले.
  4. ^ "'नीतिमत्तादेखील जातीशी बांधील'". Loksatta. 2013-01-15. 2018-04-01 रोजी पाहिले.