अचला जोशी (इ.स. १९३८ - ) या एक मराठी लेखिका आणि उद्योजिका आहेत.

या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष आहेत. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी या आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधली. त्यांनी आश्रम नावाचं घर हे पुस्तक लिहिले आहे.

या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

अचला जोशी यांनी त्यांच्या तळोज्याच्या फॅक्टरीत परफेक्ट ब्लेंडिंग(परिपूर्ण व अचूकपणे एकजीव) केलेली प्रिन्सेस वाईन बनवली.

दादर हिंदू कॉलनीतील कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी.एम.फडके हे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्‍ज्ञ डॉ.अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत.

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • इ.स. १९८३ साली, अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि 'द फर्स्ट वाईन लेडी' म्हणून त्यांचे नाव देशभर झाले.
  • ८-९-१० नोव्हेंबर, इ.स. २०१३ या कालावधीत सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४थ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अचला जोशी होत्या.

पुस्तके

संपादन
  • An Amazing Grace
  • आश्रम नावाचे घर
  • हरी नारायण आपटे (चरित्र)
  • ज्ञानतपस्वी रुद्र (न.र. फाटक यांचे चरित्र)
  • चंद्रमे जे अलांछन : अचला जोशी यांचे बंधू डॉ.अजित फडके यांचे चरित्र