Disambig-dark.svg


दापोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातले व पालघर तालुक्यातील एक गांव आहे. ते पालघर शहरापासून फक्त ३ किमी. अंतरावर अाहे. दापोली गाव हे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-डहाणू रोड उपनगरीय रेल्वे लाईनवरील पालघर रेल्वे स्टेशनपासून ५ किमी़ अतंरावर आणि उमरोळी रेल्वे स्टेशनपासून २ किमी.वर आहे. शेती हा गांवातील प्रमुख व्यवसाय आहे.

  ?दापोली (पालघर जिल्हा)
महाराष्ट्र • भारत
—  गांव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मुख्यालय पालघर जिल्हा
मोठे शहर मुंबई
जवळचे शहर पालघर
विभाग कोकण
जिल्हा पालघर
भाषा मराठी
सरपंच
संसदीय मतदारसंघ पालघर
तहसील पालघर
पंचायत समिती पालघर
ग्रामपंचायत दापोली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• महा-०४,महा-४८

गुणक: 19°44′N 72°44′E / 19.74°N 72.73°E / 19.74; 72.73

दापोलीचे अक्षांश १९.७४° उत्तर व रेखाश ७२.७३° पूर्व असे आहेत.

इतिहाससंपादन करा

फार वर्षापूर्वी दापोली गांवाची सरकार दप्तरी ‘दापिवली’ अशी नोंद होती.

विशेष माहितीसंपादन करा

  • १) केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील पहिले नारळ बीजोत्पादन केंद्र मौजे-दापोली,ता.जि.पालघर येथे सुरू केले. या केद्रासाठी दापोली गांवातील १०० एकर शासकीय जमीन ३० वर्षाच्या करारवर देण्यात आली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील कामास सुरुवात करण्यात आली आहे. (जानेवारी २०१८)
  • २) केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा महत्त्वांकांक्षी प्रकल्प-सागरकिनारी महामार्ग, हा दापोली गांवातून जाणार आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र व गोवा ही भारताच्या पश्चिमेकडील तीन राज्ये जोडली जाणार आहेत.

सागरी मार्गाच्या नावाने या रस्त्याचा प्रस्ताव मंजूर होऊन २००५ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली.त्यानंतर २००६ मध्ये कामास सुरुवात झाली. पालघर जिल्हातील मौजे दापोली येथील ५.२० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यादरम्यान खाडीचा भाग येत असल्याने दापोली आणि आगवण येथे २० कोटी रुपये खर्च करून अनुक्रमे दोन ठिकाणी १२२ मीटर आणि १२८ मीटर लांबीचे पूल उभारण्यात आले आहेत. पुढील काम सुरू आहे. (जानेवारी २०१८)

औद्योगिक माहितीसंपादन करा

  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामडंळाने स्थापन केलेली तारापूर औद्योगिक वसाहत दापोलीपासून ५ किमी. अतंरावर आहे.

मंदिरेसंपादन करा

गावात साई बाबा मंदिर , रेणुका माता मंदिर व गावदेवी मंदिर असी तीन देवळे आहेत.

प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

सामाजिक वनीकरण क्षेञ, पाझर तलाव, खाडी किनारा, दापोली-उमरोळी रस्तावरील पूल, व सागरी महामार्ग, इत्यादी.

दापोली गावातील शाळासंपादन करा

  • १) १९३५ साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची मराठी शाळा
  • २) हरिजन पाड्यातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा


●माहिती संकलन:- विशाल प्रमोद संखे(दापोली)