पंढरीनाथ दत्तात्रेय रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके आहेत.

पंढरीनाथ रेडकर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • आदरातिथ्य (माधव प्रांजळ यांच्या संबंधी)
  • कर्पिल (कथासंग्रह)
  • कळशीभर पाणी (कवितासंग्रह)
  • गगन (संपादित, तीन पिढ्यांतील १७ लेखकांच्या कथांचा संग्रह)
  • जनी
  • तीर्थवेळ (कवितासंग्रह)
  • रंकाळ्याचा तालेवार (छत्रपती शाहू महाराज)
  • फणा (कथासंग्रह)
  • महाभारत : भेदिले सूर्यमंडळ
  • माझी युरोप यात्रा (आगामी, मार्च २०१९)
  • मेरेवरची पाती (कवितासंग्रह)
  • येई चांदणे माहेरा (कवितासंग्रह)
  • रथ (कथासंग्रह)
  • सुंदरा ('मधुबाला'वरचे काव्य) :
  • हंबर (ललित लेखसंग्रह)
  • हे पाहिले सूर्य मी (आगामी, मार्च २०१९)

पंढरीनाथ रेडकर यांना मिळलेले पुरस्कार

संपादन
  • ‘मेरेवरची पाती’ या काव्यसंग्रहाला चिपळूण येथील लोकमान्य वाचनालयाचा ‘मृदुंगी’ काव्य पुरस्कार..
  • ‘मेरेवरची पाती’ला कविवर्य दत्ता हलसगीकर काव्य पुरस्कार (सोलापूर).
  • 'हंबर' पुस्तकाला कोंकण मराठी साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार