केळवेरोड

(केळवे रोड या पानावरून पुनर्निर्देशित)

केळवे रोड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?केळवे रोड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .७४३ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
४,७५४ (२०११)
• ६,३९८/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वाडवळी, आदिवासी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०१
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थानसंपादन करा

पालघर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेला चर्चगेटकडे हे पुढचे रेल्वे स्थानक असलेले गाव आहे. पालघरपासून माहीम रस्तामार्गाने हे गाव १८ किमी अंतरावर आहे तर कमारे मार्गाने गेल्यास ११ किमी अंतरावर आहे. विरार रेल्वे स्थानकापासून डहाणूकडे हे तिसरे रेल्वे स्थानकगाव आहे.

हवामानसंपादन करा

पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवनसंपादन करा

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०८१ कुटुंबे राहतात. एकूण ४७५४ लोकसंख्येपैकी २४५४ पुरुष तर २३०० महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.६९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.७१ आहे तर स्त्री साक्षरता ६२.०३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५९६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.५४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व वाडवळ समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधासंपादन करा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस केळवे गावातून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा केळवे गावावरून दिवसभर उपलब्ध असतात.पश्चिम रेल्वेने विरार डहाणू लोकलने येथे येण्यास फार सोईस्कर आहे.

जवळपासची गावेसंपादन करा

माहीम, वडराई, टोकराळे, बांदते, झांझरोळी, केळवे, मांगेलवाडा, मायखोप, रोठे, लालठाणे, गिरनोळी ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भसंपादन करा

1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html 2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html