राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हैदराबाद महानगरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ हैदराबाद शहराच्या २२ किमी दक्षिणेस शमशाबाद ह्या गावाजवळ स्थित आहे. २३ मार्च २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ सरकारी-खाजगी भागेदारीद्वारे बांधण्यात आलेला भारतामधील दुसराच विमानतळ होता. हा नवा विमानतळ वापरात आल्यानंतर हैदराबादमधील अपूरा पडत असलेला व शहराच्या मध्यभागात असलेला बेगमपेट विमानतळ नागरी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: HYD – आप्रविको: VOHS
| |||
नकाशा | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
प्रचालक | जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड
| ||
कोण्या शहरास सेवा | हैदराबाद | ||
स्थळ | शमशाबाद, तेलंगणा, भारत | ||
हब | |||
समुद्रसपाटीपासून उंची | २,०२४ फू / ६१७ मी | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९L/२७L | १३,९७६ | ४,२६० | डांबरी |
०९R/२७R | १२,४६७ | ३,८०० | डांबरी[२] |
सांख्यिकी (एप्रिल २०१२-मार्च २०१३) | |||
प्रवासी आवागमन | ८३,००,४६९ | ||
विमान उड्डाणोत्तलन | ९०,१५१ | ||
सामान (टन) | ७९,२३६ | ||
स्रोत: ए.ए.आय.[३][४][५] |
आंध्र प्रदेशचा दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्याने हैदराबाद विमानतळाला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांचे नाव दिले. सध्या हा विमानतळ भारतामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जात असून येथून भारतामधील सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे.
राजीव गांधी विमानतळ हैदराबाद शहरासोबत एका ११.६ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाद्वारे जोडला गेला आहे.
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Lufthansa Cargo eröffnet Pharma-Drehkreuz Hyderabad". 2013-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०५-१६ रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-01 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-03-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-03-01 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2013-11-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-03-01 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2013-10-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-03-01 रोजी पाहिले.