युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
(युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद या पानावरून पुनर्निर्देशित)
युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद (इंग्लिश: UEFA European Football Championship) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे. युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. यूरो २०१२ जिंकणारा स्पेन हा सद्य विजेता देश आहे.
स्थापना | इ.स. १९६० |
---|---|
प्रदेश | युरोप (युएफा) |
संघांची संख्या |
५२ (पात्रता फेरी) १६ (अंतिम स्पर्धा) |
सद्य विजेते |
![]() |
सर्वाधिक विजय |
![]() ![]() (३ वेळा विजेते) |
![]() |
आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी जर्मनी व स्पेन देशांनी ३, फ्रान्सने २ वेळा तर इटली, चेकोस्लोव्हाकिया, नेदरलँड्स, डेन्मार्क, ग्रीस व सोव्हिएत संघ देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.
मागील विजेतेसंपादन करा
१तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.
- की:
- एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
- पेशू — पेनल्टी शूटआउट