राज्यसभा

भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह
(भारतीय राज्यसभा या पानावरून पुनर्निर्देशित)

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली।

राज्यसभा
प्रकार
प्रकार वरिष्ठ सभागृह
इतिहास
नेते
सभापती ॲड. जगदीप गोकलचंद धनखड, भारतीय जनता पक्ष
(११ ऑगस्ट २०२२ पासून)
उपसभापती हरिवंश नारायण सिंग, जनता दल (संयुक्त)
(१४ सप्टेंबर २०२० पासून)
सभागृह नेता ॲड. जगतप्रकाश नारायणलाल नड्डा, भारतीय जनता पक्ष
(२४ जून २०२४ पासून)
सभागृह उपनेता रिक्त
(१ ऑक्टोबर २०२२ पासून),
विरोधी पक्षनेता ॲड. मप्पना मल्लिकार्जून खड्गे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(१६ फेब्रुवारी २०२१ पासून)
विरोधी पक्ष उपनेता प्रमोद कुमार तिवारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(१३ मार्च २०२३ पासून)
संरचना
सदस्य २४५ (२३३ निर्वाचित + १२ नियुक्त)
समिती
List
  • वाणिज्य संबंधी समिती
  • गृह कार्य संबंधी समिती
  • मानव संसाधन विकास संबंधी समिती
  • उद्योग संबंधी समिती
  • विज्ञान आणि प्रौद्योगिकी, पर्यावरण आणि वन संबंधी समिती
  • परिवहन, पर्यटन आणि संस्कृति संबंधी समिती
  • कार्मिक, लोक शिकायत, विधि आणि न्याय संबंधी समिती
  • स्वास्थ्य और परिवार कल्याण संबंधी समिती
निवडणूक
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली
संकेतस्थळ
राज्यसभेचे संकेतस्थळ
तळटिपा

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. इवलेसे|Rajy-sabhaa in india राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत, शिवाय धन विधेयक (Money/Supply Bill) जेथे लोकसभेस अध्यारोही अधिकार आहेत. परस्पर विरोधी ठराव झाल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते. परंतु लोकसभेची सभासद संख्या दुप्पट असल्याने त्यांना बहुमत मिळून जाते.

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

सदस्य पात्रता

संपादन
  1. राज्यसभेचा सभासद होण्यास तो/ती व्यक्ति भारतीय नागरिक असावी.
  2. वय तीस पेक्षा जास्त असावे.
  3. ही व्यक्ती मानसिक रीत्या निरोगी असून कर्जबाजारीही (दिवाळखोर) नसावी.
  4. ह्या व्यक्तीने शपथपत्र द्यावे ज्यात त्याच्या कोणत्याही अपराधी कारवाई करण्यात आली नाही.
  5. आरक्षित जागांसाठी ही व्यक्ती अनुसूचित जाती/ जमातीतील असावी लागते.

संख्याबळ

संपादन
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता मतदारसंघ
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(११९)

भारतीय जनता पक्ष ९५ ॲड. जगतप्रकाश नड्डा गुजरात
नियुक्त सुधा नारायण मूर्ती
गणतीसीगन रामस्वामी 'इळैयराजा'
कोडुरी विश्व विजयेंद्र प्रसाद
पिलावुल्लकांडी थेक्कपारंबिल उषा
विरेंद्र रत्नवर्मा हेग्गडे
जस्टिस रंजन केशवचंद गोगोई
राष्ट्रपती नियुक्त
जनता दल (संयुक्त) संजय कुमार झा बिहार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल मनोहर पटेल महाराष्ट्र
जनता दल (धर्मनिरपेक्ष) हरदनहळ्ळी दड्डेगौडा देवेगौडा कर्नाटक
शिवसेना मिलिंद मुरली देवडा महाराष्ट्र
राष्ट्रीय लोक दल जयंत अजित चौधरी उत्तर प्रदेश
राष्ट्रीय लोक मोर्चा उपेंद्रसिंह मुनेश्वरसिंह कुशवाह बिहार
पट्टाळी मक्कल कट्ची डॉ. अन्बुमणी रामादोस तमिळनाडू
आसाम गण परिषद बिरेंद्र प्रकाश बैश्य आसाम
तमिळ मनिला काँग्रेस (मुपनार) वासन गोविंदस्वामी करुप्पिया तमिळनाडू
नॅशनल पीपल्स पार्टी वानवेरॉय खारलुखी मेघालय
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रामदास बंडू आठवले महाराष्ट्र
संयुक्त जनता पक्ष, लिबरल रंगवरा फणीधर नारझरी आसाम
अपक्ष कार्तिकेय विनोद शर्मा हरियाणा
विरोधी आघाडी
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

(८७)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २७ ॲड. मप्पना मल्लिकार्जून खड्गे कर्नाटक
अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस १२ डेरेक नील ओ'ब्रायन पश्चिम बंगाल
आम आदमी पक्ष १० संजय सिंह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
द्रविड मुन्नेत्र कळघम १० तिरुची सिवा तमिळनाडू
राष्ट्रीय जनता दल प्रेमचंद गुप्ता बिहार
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डॉ. जॉन ब्रिटस केरळ
समाजवादी पक्ष रामगोपाळ बच्चीलाल यादव उत्तर प्रदेश
झारखंड मुक्ति मोर्चा शिबू सोरेन झारखंड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार शरद गोविंदराव पवार महाराष्ट्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राजाराम राऊत महाराष्ट्र
भारतीय कम्युनिस्ट पक्ष पी.पी. सुनीर केरळ
इंडियन युनियन मुस्लिम लीग पुल्लीकल वेट्टी अब्दुल वहाब केरळ
मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम ॲड. गोपाळसामी नायकर वैयपुरी तमिळनाडू
आंचलिक गण मोर्चा अजित कुमार भुयान आसाम
केरळ काँग्रेस (मणी) जोस मणी करिंगोचळ केरळ
अपक्ष ॲड. कपिल हिरालाल सिब्बल उत्तर प्रदेश
इतर/तटस्थ गट

(२५)

युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष वेणुम्बका विजयसाई रेड्डी आंध्र प्रदेश
बिजू जनता दल डॉ. सस्मित पात्रा ओडिशा
भारत राष्ट्र समिती केतीरेड्डी सुरेश रेड्डी तेलंगणा
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम मुनीस्वामी थंबीदुराई तमिळनाडू
बहुजन समाज पक्ष रामजी गौतम उत्तर प्रदेश
मिझो नॅशनल फ्रंट के. वनलालवेणा मिझोरम
रिक्त
(१४)
१४
एकूण २४५

सदस्यत्व

संपादन

सामान्यतः राज्यसभेचे दर वर्षी ३ सत्र होतात.

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन