भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)

भारतातील एक राजकीय पक्ष
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पानावरून पुनर्निर्देशित)


भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) (संक्षिप्त: भारिप (आ)) (इंग्रजी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले); संक्षिप्त: आरपीआय (ए)) हा भारताच्या एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष रामदास आठवले हे आहेत. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक आहे. आंबेडकरवादी व लोकशाहीवादी विचारसरणीचा हा पक्ष असून तो आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष उतम खोब्रागडे आहेत. इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली होती. दयाळ बहादुरे यांनी स्वतःचा भारतीय दलित पॅंथर पार्टी नावाचा पक्ष काढला आहे.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

संपादन