ग्रँट रोड रेल्वे स्थानक
(ग्रॅंट रोड रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रॅंट रोड हे मुंबई शहराच्या ग्रॅंट रोड भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे.
ग्रॅंट रोड मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाचा देखावा | |
स्थानक तपशील | |
पत्ता | मौलाना शौकतअली रस्ता, ग्रॅंट रोड, मुंबई |
गुणक | 18°58′57″N 72°49′27″E / 18.98250°N 72.82417°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
ग्रँट रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: चर्नी रोड |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: मुंबई सेंट्रल (लोकल) | |
स्थानक क्रमांक: ४ | चर्चगेटपासूनचे अंतर: ३ कि.मी. |
इतिहास
संपादनया स्थानकाला मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटचे नाव देण्यात आले. इ.स. १८५९मध्ये बांधलेले हे स्थानक पूर्वीच्या बी.बी. अँड सी.आय. रेल्वेमार्गाचे टोकाचे स्थानक होते. येथून सुरतेकडे जाण्यास गाड्या निघत. कालांतराने येथील प्रवासी वाहतूक मुंबई सेन्ट्रलला हलवून ग्रॅंट रोडला मालधक्क्याचे स्वरूप देण्यात आले. उपनगरी प्रवासी रेल्वे वाहतूक या स्थानकावर चालूच होती.