इब्न बतूता

मध्ययुगीन प्रवासी
(इब्न बतूत या पानावरून पुनर्निर्देशित)

इब्न बतूता (२५ फेब्रुवारी, १३०४;टॅंजियर, मोरोक्को - इ.स. १३६९:मोरोक्को; अरबी: أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة, अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता), किंवा फक्त मुहम्मद इब्न बतूता (محمد ابن بطوطة) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वांत महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते.[][] तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल रिहला (शब्दशः भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आजही हे पुस्तक प्रमाण मानले जाते.

इब्न बतूता
जन्म अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतूता
أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة
२५ फेब्रुवारी, १३०४
टॅंजियर, मोरोक्को
मृत्यू इ.स. १३६९ (६४-६५ व्या वर्षी)
मोरोक्को
पेशा प्रवासी, भूगोलवेत्ता
कारकिर्दीचा काळ मध्ययुगीन कालखंड
धर्म इस्लाम

तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया, चीन या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो भारतातही आला होता.

बालपण व शिक्षण

संपादन

इब्न बतूताच्या बालपणाबद्दलची माहिती त्याच्या प्रवासवर्णनांतील आत्मचरित्रात्मक भागांतून सापडते. यानुसार हा लवाटा जमातीचा[] बर्बर वंशीय[] होता व याचे पूर्वज आणि समकालीन कुटुंब न्यायाधीशांचे होते. इब्न बतूताचा जन्म २४ फेब्रुवारी, १३०४ रोजी मोरोक्कोच्या टॅंजियर शहरात झाला.[] त्यावेळी तेथे मारीनी वंशाचे राज्य होते. लहानपणी हा सुन्नी मलिकी मदहब शाळेतून शिकला असण्याची शक्यता आहे. टॅंजियरच्या रहिवाशांनी इब्न बतूताला धर्मन्याय देण्याची विनंती केली होती.

प्रवास

संपादन

पहिली सफर

संपादन

इ.स. १३२५ च्या जून महिन्यात वयाच्या एकविसाव्या वर्षी इब्न बतूता मक्केला हजसाठी जाण्याकरता घरातून बाहेर पडला. तेव्हा हा प्रवास येउनजाउन सोळा महिन्यांचा असे. बतूताने पुढील चोवीस वर्षे मोरोक्कोत पाउल ठेवले नाही.[] आपल्या पहिल्या सफरीच्या सुरुवातीबद्दल इब्न बतूता लिहितो -

मी एकटाच निघालो. सोबतीला सहप्रवासी असे कोणी नव्हते ज्यांच्या सोबतीत मला आनंद मिळेल. जोडीने जायला मला कोणता कारवांही नव्हता. माझ्या हृदयातील दूरवरच्या अद्भूत प्रदेशांना भेट देण्याची अनेक वर्षे साठवून ठेवलेली इच्छा आणि त्यावेळी आलेली लहर यांना बळी पडून मी माझे मन कठीण केले आणि माझे सुहृद, पुरुष आणि स्त्रीया, यांना सोडण्याचा निश्चय केला. पक्षी जसे आपले घरटे सोडून निघून जातात तसे मी माझे घर सोडण्याचे ठरवले. माझे आईवडील अद्याप संसारी होते आणि त्यांना सोडून जाण्याचे मला जीवावर आले. त्यांचा विरह सहन करणे मला कठीण झाले.[]

पहिली हज

संपादन

टॅंजियरपासून इब्न बतूता उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत प्रवास करीत मक्केकडे निघाला. झय्यानी सुलतान अब्द अल-वदीद आणि हफसी सुलतानांच्या प्रदेशातील ट्लेमेसेन, बेजाइया शहरांतून प्रवास करीत हा ट्युनिसियाला पोचला. येथे त्याने दोन महिने मुक्काम केला.[] लुटारू आणि वाटमाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी इब्न बतूता थोड्या थोड्या अंतराकरता एखाद्या तांड्याच्या साथीने प्रवास करीत असे. स्फाक्स शहरात पोचल्यावर त्याने लग्न केले.[] आपल्या प्रवासातील अनेक लग्नांपैकी हे पहिले होय.[१०]

इ.स. १३२५च्या वसंतात ३,५०० किमीचा प्रवास करून इब्न बतूता इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरात दाखल झाला. तेथे त्याची भेट शेख मुर्शिदी आणि शेख बुरहानुद्दीन या मुस्लिम संतांशी झाली. दोघांनीही इब्न बतूता जगप्रवासी होणार असल्याचे भाकित केले होते. बुरहानुद्दीनने इब्न बतूताला सांगितले - तुला परदेशप्रवासाची आवड आहे असे दिसते. तुझी भेट भारतातील माझे बंधू रुकोनुद्दीन आणि चीनमधील बुरहानुद्दीनशी होईल. त्यांना माझा सलाम सांग.[११][१२] या प्रदेशात इब्न बतूताने काही काळ घालवल्यावर तो बाहरी मामलुक सुलतानांची राजधानी असलेल्या कैरो शहराकडे निघाला. तेथे महिनाभर वास्तव्य केल्यावर इब्न बतूताने मक्केकडे जाणाऱ्या तीन मार्गांपैकी सगळ्यात कमी वर्दळीचा रस्ता चोखाळला.[१३] कैरोतून तो नाईल नदीच्या तीरावरून दक्षिणेकडे गेला व नंतर पूर्वेस वळून लाल समुद्रावरील अयधाब बंदराजवळ पोचला.[a] तेथे चाललेल्या बंडाळीमुळे पुढचा रस्ता रोखला गेला व इब्न बतूता कैरोला परतला.[१५]

पुन्हा एकदा मक्केकडे जाण्यासाठी इब्न बतूताने दमास्कसचा रस्ता धरला. या रस्त्यावर हेब्रॉन, बेथलेहेम आणि जेरुसलेम सारखी अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन तीर्थस्थाने असल्याने मामलुक सैन्य या रस्त्यावर निगराणी ठेवून असे व यात्राळूंचा प्रवास निर्धोक होत असे.[१६] इब्न बतूता लिहितो की तो कैरोपासून १६ जुलैला निघाला व नागमोडी वळणे घेत वीस शहरांना भेट देऊन ९ ऑगस्टला पॅलेस्टाइनमध्ये पोचला. त्या काळात असा प्रवास अशक्य असल्याचे विद्वानांचे मत आहे.[१७][१८] दमास्कसमध्ये रमझानचा महिना घालवल्यावर इब्न बतूताने मदीनाकडे जाणारा एक तांडा धरला. १,३०० किमीचा प्रवास करीत मदीनाला पोचल्यावर तो पुढे मक्केस पोचला.

येथून घरी परतण्याऐवजी इब्न बतूताने पुढे मोंगोल साम्राज्याचे ठाणे असलेल्या इल्खानेत या ठिकाणी जाण्याचे ठरवले.[१९]

इराक आणि पर्शिया

संपादन
 
इब्न बतूताने तबरेझ या पर्शिया-अझेरी शहराला १३२७मध्ये भेट दिली होती.

मक्केत एक महिना राहिल्यावर १३ नोव्हेंबर, १३२६ रोजी इब्न बतूता अरबी वाळवंट पार करणाऱ्या एका तांड्याबरोबर मदीनामार्गे इराककडे निघाला.[२०] रात्रीचा प्रवास करीत हा तांडा दोन आठवड्यांनी नजफ येथे पोचला. येथे इब्न बतूताने इस्लामच्या चौथा खलीफा अलीच्या कबरीला भेट दिल्याची नोंद केली आहे.[२१]

येथून तांड्याबरोबर बगदादला न जाता इब्न बतूता इराण/पर्शियाकडे वळला. नजफपासून वसात शहरास गेल्यावर तैग्रिस नदीचा काठ धरून तो दक्षिणेस थेट बसरा बंदरास गेला. तेथून झाग्रोस पर्वतरांग पार करून हा इस्फहान येथे गेला आणि नंतर दक्षिणेस शिराझ शहरास आला. उत्तरेत मोंगोलांनी बेचिराख केलेल्या शहरांपेक्षा शिराझची स्थिती चांगली असल्याची त्याने नोंद केली आहे. शिराझपासून माघारी फिरत इब्न बतूता पुन्हा पर्वतरांग पार करून १३२७ च्या उन्हाळ्यात बगदादला पोचला.[२२] यावेळी बगदादमध्ये ७० वर्षांपूर्वी हुलागु खानाच्या सैन्याने केलेल्या लुटालूट आणि जाळपोळीतून बगदाद अद्यापही सावरलेले नव्हते.[२३]

इब्न बतूता बगदादला परतला तेव्हा तेथील शेवटचा मोंगोल सरदार अबू सईद बहादुर खान मोठा काफिला घेउन उत्तरेस निघाला होता..[२४] इब्न बतूता या काफिल्यात शामिल झाला पण नंतर उत्तरेस रेशीममार्ग धरून तबरेझला गेला. हे शहर मोंगोलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असल्याने त्याची फारशी नासधूस झालेली नव्हती.[२५]

तबरेझपासून इब्न बतूता बगदादला परत आला. यावेळी तो तैग्रीस नदीचा मार्ग धरून मोसुलला गेला. तेथे त्याने इल्खानेतच्या सरदाराचा पाहुणचारही घेतला.[२६] तेथून हा सध्याच्या तुर्कस्तानमधील सिझ्रे आणि मार्दिनला गेला. वाटेत सिंजरजवळील डोंगरावर त्याला एक कुर्दी साधू भेटला. त्याने इब्न बतूताला चांदीची काही नाणी दिली.[b][२९] मोसुलला परत येऊन इब्न बतूताने बगदादकडे जाणारा तांडा धरला. तीर्थयात्रींचा हा तांडा बगदादला मुख्य प्रवाहाला मिळाला व त्यांनी अरबी वाळवंट पार करीत मक्का गाठले. या प्रवासात आजारी पडलेला इब्न बतूताने कसेबसे करून आपली दुसरी हज पूर्ण केली.[३०]

अरबस्तान

संपादन

वर्षभर मक्केत राहून इब्न बतूता १३२८ किंवा १३३० मध्ये जेद्दाला गेला. तेथून छोट्या होड्यांमधून किनाऱ्यालगत प्रवास करीत तो यमनला पोचला. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेचा हा प्रवास संथगतीचा होता. यमनमध्ये त्याने झाबिद आणि ताइझ शहरांना भेट दिली. तेथे त्याने रसुली साम्राज्याच्या शासकाची भेट घेतली. इब्न बतूता लिहतो की त्याने साना शहरात काही दिवस घालवले परंतु हे नक्की ठरवणे कठीण आहे..[३१] सानातून किंवा ताइझपासून तो एडनला गेला.[३२]

सोमालिया

संपादन

एडनपासून इब्न बतूताने सोमालियातील झैला शहराकडे जाणारे जहाज धरले. तेथे एक आठवडा राहून तो केप गार्डाफुई या भूशिरास गेला. तेथेही एक आठवडा घालवल्यावर तो पुढे मोगादिशूला पोचला.[३३][३४][३५] १३३१ साली इब्न बतूता मोगादिशूला पोचला तेव्हा हे शहर आपल्या वैभवाच्या कळसावर होते. त्याने मोगादिशू अतिप्रचंड शहर असल्याचे वर्णन केले आहे. येथील श्रीमंत व्यापारी अनेक प्रकारच्या सामानाचा व्यवहार करीत व उच्च प्रतीचे कापड इजिप्तसह अनेक देशांना पाठवित असत.[३६] यासुमारास मोगादिशूवर अबू बक्र इब्न सेयक्स उमर या सुलतानाची सत्ता होती.[३७][३८] हा मूळ उत्तर सोमालियातील होता व मोगादिशान (सोमाली) आणि अरबी या दोन्ही भाषा सफाईने बोलायचा.[३८][३९] याच्या दरबारात अनेक वजीर, कायदेपंडित, सेनापती, तृतीयपंथी सेवक आणि हुजरे होते असे इ्ब्न बतूता लिहितो.[३८]

बिलाद अल झांज

संपादन

इब्न बतूता येथून पुढे जहाजाने दक्षिणेकडे निघाला. झांज लोकांचा प्रदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या[४०] या प्रदेशातील मोम्बासा शहरात तो एक रात्र थांबल्याचे त्याने लिहिले आहे.[४१] आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील या प्रदेशात स्वाहिली बोलणाऱ्या लोकांची वस्ती होती. मोम्बासाहून तो सध्याच्या टांझानिया देशातून किल्वा द्वीपावर गेला.[४२] हे बेट सोन्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र होते.[४३] जगातील सुंदर शहरांतील एक असलेल्या शहरातील घरे लाकडी होती आणि छतांवर डिसची झावळे होती.[४४]

दुसरी सफर

संपादन

तिसरी सफर

संपादन

बाह्य दुवे

संपादन

स्रोत

संपादन
  • व्ही. नागम अय्या. त्रावणकोर स्टेट मॅन्युअल (इंग्रजी भाषेत).CS1 maint: ref=harv (link)
  • डुन, रॉस इ. द ॲडव्हेंचर्स ऑफ इब्न बतुता (इंग्रजी भाषेत).. पहिली आवृत्ती १९८६, आयएसबीएन ०-५२०-०५७७१-६.
  • गिब, एच.ए.आर. ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड १) (इंग्रजी भाषेत). लंडन..
  • गिब, एच.ए.आर. ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड २) (इंग्रजी भाषेत). लंडन..
  • गिब, एच.ए.आर. ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड ३) (इंग्रजी भाषेत). लंडन..
  • गिब एच.ए.आर., बेकिंगहॅम ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड ४) (इंग्रजी भाषेत). लंडन.. १९७१ साली गिब यांचा मृत्यू झाल्यानंतर बेकिंगहॅम यांनी या खंडाचे भाषांतर केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ डुन २००५, पान. २०.
  2. ^ नेहरू, जवाहरलाल. ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी (इंग्रजी भाषेत). p. ७५२.
  3. ^ डिफ्रेमेरी & सॅंग्विनेटी १८५३, p. 1 Vol. 1; डन २००५, p. १९
  4. ^ डन २००५, पान. २०.
  5. ^ डन २००५, p. १९
  6. ^ डन २००५, पाने. ३०-१३.
  7. ^ Defrémery & Sanguinetti 1853, p. 13 Vol. 1; Gibb 1958, p. 8
  8. ^ डन २००५, p. ३७; डिफ्रेमेरी & सॅंग्वेनेटी १८५३, p. 21 Vol. 1
  9. ^ Dunn 2005, p. 37; Defrémery & Sanguinetti 1853, p. 21 Vol. 1
  10. ^ Dunn 2005, p. 39; Defrémery & Sanguinetti 1853, p. 26 Vol. 1
  11. ^ Travels of Ibe Batutah translated by H.A.R Gibb
  12. ^ Defrémery & Sanguinetti 1853, p. 27 Vol. 1
  13. ^ Dunn 2005, p. 49; Defrémery & Sanguinetti 1853, p. 67 Vol. 1
  14. ^ Peacock & Peacock 2008.
  15. ^ Dunn 2005, pp. 53–54
  16. ^ Dunn 2005, पान. 54.
  17. ^ Gibb 1958, पान. 81 Note 48.
  18. ^ Hrbek 1962, पाने. 421-425.
  19. ^ Dunn 2005, पाने. 66-79.
  20. ^ Dunn 2005, pp. 88–89; Defrémery & Sanguinetti 1853, p. 404 Vol. 1; Gibb 1958, p. 249 Vol. 1
  21. ^ Gibb 1958, pp. 255–257 Vol. 1; Dunn 2005, pp. 89–90
  22. ^ Dunn 2005, p. 97; Defrémery & Sanguinetti 1854, p. 100 Vol. 2
  23. ^ Dunn 2005, पाने. 41, 97.
  24. ^ Dunn 2005, pp. 98–100; Defrémery & Sanguinetti 1854, p. 125 Vol. 2
  25. ^ Dunn 2005, pp. 100–101; Defrémery & Sanguinetti 1854, pp. 128–131 Vol. 2
  26. ^ Defrémery & Sanguinetti 1854, पाने. 134-139 Vol. 2.
  27. ^ Mattock 1981.
  28. ^ Dunn 2005, पान. 102.
  29. ^ Dunn 2005, p. 102; Defrémery & Sanguinetti 1854, p. 142 Vol. 2
  30. ^ Dunn 2005, pp. 102–103; Defrémery & Sanguinetti 1854, p. 149 Vol. 2
  31. ^ Dunn 2005, pp. 115–116, 134
  32. ^ Gibb 1962, p. 373 Vol. 2
  33. ^ संजय सुब्रह्मण्यम, द कारकीर्द ॲंड लेजंड ऑफ वास्को दा गामा, (कॅंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस: १९९८), pp. 120-121.
  34. ^ J. D. Fage, Roland Oliver, Roland Anthony Oliver, The Cambridge History of Africa, (Cambridge University Press: 1977), p. 190.
  35. ^ जॉर्ज विन ब्रेरेटॉन हंटिंगफोर्ड, Agatharchides, The Periplus of the Erythraean Sea: With Some Extracts from Agatharkhidēs "On the Erythraean Sea", (Hakluyt Society: 1980), p. 83.
  36. ^ हेलन चॅपिन मेत्झ (1992). सोमालिया: अ कंट्री स्टडी (इंग्लिश भाषेत). US: फेडरल रीसर्च डिव्हिजन, लायब्ररी ऑफ काँग्रेस.CS1 maint: unrecognized language (link)
  37. ^ व्हेरस्टीघ, कीस (2008). Encyclopedia of Arabic language and linguistics, Volume 4. Brill. p. 276. ISBN 9004144765. 1 जानेवारी 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  38. ^ a b c David D. Laitin, Said S. Samatar, Somalia: Nation in Search of a State, (Westview Press: 1987), p. 15.
  39. ^ Chapurukha Makokha Kusimba, The Rise and Fall of Swahili States, (AltaMira Press: 1999), p.58
  40. ^ चिट्टिक १९७७, p. १९१
  41. ^ गिब १९६२, p. ३७९ खंड २
  42. ^ Defrémery & Sanguinetti 1854, p. 192 Vol. 2
  43. ^ Dunn 2005, pp. 126–127
  44. ^ Gibb 1962, p. 380 Vol. 2; Defrémery & Sanguinetti 1854, p. 193, Vol. 2


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.