तैग्रिस नदी
तैग्रिस सध्याच्या तुर्कस्तान, सीरियाची सीमा आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पूर्वेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.
बगदाद शहरातील तैग्रिस नदीचे पात्र | |
इतर नावे | दिज्ला, दिज्ले, |
---|---|
उगम | पूर्व तुर्कस्तान |
मुख | शत्त अल-अरब |
पाणलोट क्षेत्रामधील देश | तुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण |
लांबी | १,९०० किमी (१,२०० मैल) |
उपनद्या | दियाला, झाब |
तैग्रिसची लांबी १,९०० कि.मी. (१,१८० मैल) आहे. हिचा उगम पूर्व तुर्कस्तानमधील टॉरस पर्वतात होतो व साधारण आग्नेयेकडे वहात ही नदी युफ्रेतिस नदीला मिळते.