शिराझ
शिराझ (फारसी: شیراز) ही इराण देशाच्या फार्स प्रांताची राजधानी व इराणमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिराझ शहर इराणच्या नैऋत्य भागात झाग्रोस पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते प्राचीन पर्शियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते.
शिराझ شیراز |
|
इराणमधील शहर | |
देश | ![]() |
प्रांत | फार्स प्रांत |
क्षेत्रफळ | २४० चौ. किमी (९३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,२०० फूट (१,६०० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २३,५३,६९६ |
- घनता | ३,६०९ /चौ. किमी (९,३५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
शिराझमध्ये इ.स. पूर्व २००० सालापासून लोकवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हखामनी साम्राज्याची राजधानी असलेले शिराझ येथील साहित्य, कला व पाककृतींकरता प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मध्ययुगीन फारसी कवी हफीझ व सादी ह्यांचा जन्म शिराझमध्येच झाला होता. सध्या शिराझ दक्षिण इराणचे आर्थिक केंद्र आहे.
भारतासोबत संबंध
संपादनमुघल साम्राज्यकाळामध्ये अनेक लोक इराणहून भारताकडे स्थानांतरित झाले. आजही ह्या लोकांचे वंशज बिहारच्या किशनगंज जिल्ह्यामध्ये व इतरत्र स्थायिक झालेले आढळतात.
जुळी शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील शिराझ पर्यटन गाईड (इंग्रजी)