१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक

१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक ही एक क्रिकेट स्पर्धा २० जुलै ते १ ऑगस्ट १९९३ दरम्यान इंग्लंडमध्ये झाली. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही पाचवी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९८८ साली ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले. इंग्लंडमध्ये दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरू होण्याच्या काही काळ आधीपर्यंत भांडवलअभावी रद्द होण्याच्या स्थितीत होती. परंतु फाउंडेशन फॉर स्पोर्ट्स ॲण्ड आर्ट्स या सेवाभावी संस्थेने ९०,००० पाऊंडची मदत केल्याने स्पर्धा पार पडली.

१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक
तारीख २० जुलै – १ ऑगस्ट १९९३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान इंग्लंड इंग्लंड
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२ वेळा)
सहभाग
सामने २९
सर्वात जास्त धावा इंग्लंड जॅन ब्रिटीन (४१६)
सर्वात जास्त बळी इंग्लंड कॅरेन स्मिथीस (१५)
न्यूझीलंड जुली हॅरिस (१५)
१९८८ (आधी) (नंतर) १९९७

यावेळी विक्रमी ८ देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी महिला क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला. यजमान इंग्लंडसह माजी विजेते ऑस्ट्रेलियाबरोबरच न्यू झीलंड, आयर्लंड, नेदरलँड्स, भारत, वेस्ट इंडीज आणि डेन्मार्क हे आठ सहभागी देश होते. पैकी वेस्ट इंडीज आणि डेन्मार्क या दोन देशांचा हा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक होता.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. सर्व आठ संघांनी इतर प्रत्येक संघाशी सामना खेळला. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहत न्यू झीलंडने अंतिम सामना गाठला. पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर राहत इंग्लंडने ही अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. १ ऑगस्ट १९९३ रोजी ऐतिहासिक लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने न्यू झीलंडचा ६७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. इंग्लंडची जॅन ब्रिटीन हिने स्पर्धेत सर्वाधिक ४१६ धावा केल्या तर इंग्लंडचीच कॅरेन स्मिथीस आणि न्यू झीलंडची जुली हॅरिस या दोघींनी १५ गडी बाद करत स्पर्धेत संयुक्त आघाडी गोलंदाज ठरल्या.

सहभागी देश

संपादन
देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
  इंग्लंड यजमान, महिला संपूर्ण सदस्य १९८८ विजेते (१९७३)
  ऑस्ट्रेलिया निमंत्रित १९८८ विजेते (१९७८, १९८२, १९८८)
  डेन्मार्क पदार्पण पदार्पण
  भारत १९८२ गट फेरी (१९७८, १९८२)
  आयर्लंड १९८८ गट फेरी (१९८८)
  नेदरलँड्स १९८८ गट फेरी (१९८८)
  न्यूझीलंड १९८८ ३रे स्थान (१९८८)
  वेस्ट इंडीज पदार्पण पदार्पण

मैदाने

संपादन

विश्वचषकातील सामन्यांसाठी एकूण २५ मैदानांचा वापर करण्यात आला. अंतिम सामना परंपरेनुसार लंडन मधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
१०
 
११
 
१२
 
१३
 
१४
 
१५
 
१६
मैदाने
मैदान शहर सामने संख्या
वॉल्टन ली रोड मैदान वॉरिंग्टन
रिक्रिएशन मैदान बॅंडस्टॅंड
जॉन प्लेयर मैदान नॉटिंगहॅम
डेनिस कॉम्पटन ओव्हल शेन्ले
कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान कॉलिंगहॅम
क्राइस्टचर्च मैदान ऑक्सफर्ड
वूडब्रिज रोड गुईलफोर्ड
मियर हीथ क्रिकेट क्लब मैदान स्ट्रोक ऑन ट्र्रेंट
डॉर्किंग क्रिकेट क्लब मैदान कॉलिंगहॅम
अरुनडेल क्रिकेट क्लब मैदान अरुनडेल
चॅल्वे रोड मैदान स्लॉ
पाउंड लेन क्रिकेट मैदान मार्लो
विल्टन पार्क बीकन्सफिल्ड
नेविल मैदान टर्नब्रिज वेल्स
लिंडफिल्ड क्रिकेट क्लब मैदान लिंडफिल्ड
वेलिंग्टन कॉलेज मैदान क्रोथोर्न
मेमोरियल मैदान फिनचॅम्पस्टीड
सोनिंग लेन मैदान रीडींग
बँक ऑफ इंग्लंड मैदान लंडन
किंग्स हाऊस क्रीडा मैदान लंडन
इलिंग क्रिकेट क्लब मैदान लंडन
ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान डलविच
काउंटी मैदान बेकेनहॅम
एच.एस.बी.सी. क्लब मैदान बेकेनहॅम
लॉर्ड्स लंडन १ (अंतिम सामना)

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  न्यूझीलंड २८ ३.२०२ अंतिम सामन्यासाठी पात्र
  इंग्लंड २४ ३.३८२
  ऑस्ट्रेलिया २० ३.१४७ स्पर्धेतून बाद
  भारत १६ २.५४४
  आयर्लंड २.६०७
  वेस्ट इंडीज २.२७०
  डेन्मार्क १.९२६
  नेदरलँड्स १.७९१

गट फेरी

संपादन

सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -




























अंतिम सामना

संपादन

१९९३ महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना लंडन मधील लॉर्ड्स येथे खेळविण्यात आला. अंतिम सामन्याला एकूण चार हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ६० षटकांमध्ये इंग्लंडला १९५ धावा करण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू झीलंड संघाचे फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाहीत. इंग्लंडने न्यू झीलंडचा ६७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.