१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक (प्रायोजक नावानुसार १९८२ हॅनशेल विटा फ्रेश विश्वचषक) ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९८२ मध्ये न्यू झीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९७८ मध्ये भारतात झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक
तारीख १० जानेवारी – ७ फेब्रुवारी १९८२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान न्यूझीलंड न्यू झीलंड
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२ वेळा)
सहभाग
सामने ३१
सर्वात जास्त धावा इंग्लंड जॅन ब्रिटीन (३९१)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया लीन फुल्स्टन (२३)
१९७८ (आधी) (नंतर) १९८८

या वेळेस स्पर्धा तिहेरी साखळी पद्धतीने खेळविली गेली. यजमान न्यू झीलंडसह भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI या पाच देशांनी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय XI संघाने या आधी १९७३ च्या विश्वचषकात भाग घेतला होता. पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषकाचा निकाल हा अंतिम सामन्याद्वारे केला गेला.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.





सहभागी देश

संपादन
देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
  न्यूझीलंड यजमान, महिला संपूर्ण सदस्य १९७८ गट फेरी (१९७३, १९७८)
  ऑस्ट्रेलिया महिला संपूर्ण सदस्य १९७८ विजेते (१९७८)
  इंग्लंड १९७८ विजेते (१९७३)
  भारत १९७८ गट फेरी (१९७८)
आंतरराष्ट्रीय XI निमंत्रित १९७३ गट फेरी (१९७३)

मैदाने

संपादन

एकूण १५ मैदाने वापरण्यात आली.

मैदान शहर सामने संख्या
इडन पार्क क्र.२ ऑकलंड
कॉर्नवॉल पार्क ऑकलंड
सेडन पार्क हॅमिल्टन
पुकेकुरा पार्क न्यू प्लायमाउथ
मॅकलीन पार्क नेपियर
फिट्सहर्बर्ट पार्क पामेस्टन नॉर्थ
कुक्स गार्डन वांगानुई
बेसिन रिझर्व वेलिंग्टन
हट रिक्रिएशन मैदान लोवर हट
लोगन पार्क ड्युनेडिन
ट्राफ्लगार पार्क नेल्सन
क्राइस्ट कॉलेज क्राइस्टचर्च
कँटरबरी विद्यापीठ मैदान क्राइस्टचर्च
डडली पार्क रंगीओरा
लॅंसेस्टर पार्क क्राइस्टचर्च १ (अंतिम सामना)

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  ऑस्ट्रेलिया १२ ११ ४६ ३.१२४ अंतिम सामन्यासाठी पात्र
  इंग्लंड १२ ३२ २.९८८
  न्यूझीलंड १२ २६ २.५३४ स्पर्धेतून बाद
  भारत १२ १६ २.२९६
आंतरराष्ट्रीय XI १२ १२ २.०३४

गट फेरी

संपादन

सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -


१० जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड  
१४७/९ (६० षटके)
वि
  इंग्लंड
१४७/८ (६० षटके)

१२ जानेवारी १९८२
धावफलक
भारत  
११२ (५२.२ षटके)
वि
  इंग्लंड
११४/६ (३६ षटके)









२० जानेवारी १९८२
धावफलक
भारत  
१७८/७ (६० षटके)
वि
  इंग्लंड
१३१ (५५.५ षटके)













२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड  
१६७/८ (६० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१६७ (६० षटके)






बाद फेरी

संपादन

अंतिम सामना

संपादन

क्राइस्टचर्चमधील लॅंसेस्टर पार्क येथे खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेचा एकमेव आणि अंतिम सामन्याला तीन हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषकांमध्ये पंचगिरी करणारे डिकी बर्ड पहिले पंच ठरले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी डावाच्या शेवटच्या दहा षटकांपर्यंत हळू धावा केल्या. जॅन साउथगेटने सर्वाधिक ५३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करताना तिला अडचण झाली. शेवटच्या दहा षटकांत इंग्लंडने अधिक विस्तृत खेळ केला आणि अखेर १५१ धावा बनविल्या, याचा अर्थ ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५२ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा पाठलाग सुरू होताच ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावल्या. परंतु कॅरेन रीड आणि शॅरन ट्रेड्रिया यांच्या जोडीने ते स्थिर राहिले. नंतर जेन जॅकब्स आणि मारी कॉर्निशच्या जलद खेळीने ऑस्ट्रेलियाने सामना ३ गडी राखत जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.