महिंद्रा सत्यम पूर्वीची सत्यम कॉंप्युटर सर्व्हिसेस लिमिटेड (बीएसई.500376) ही आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा पुरवणारी भारतीय मूळ असलेली कंपनी आहे.

सत्यम कॉंप्युटर सर्व्हिसेस लिमिटेड
ब्रीदवाक्य बिझनेस ट्रांस्फॉरमेशन. टुगेदर.
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र माहिती तंत्रज्ञान
स्थापना १९८७
संस्थापक बी. रामलिंग राजू
मुख्यालय हैदराबाद, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती बी. रामलिंग राजू (संस्थापक आणि अध्यक्ष)
रामा राजू(कार्यकारी संचालक)
महसूली उत्पन्न २ अब्ज १३ कोटी अमेरिकन डॉलर (२००७-०८)
कर्मचारी (५२००० मार्च ३१, २००८ रोजी)
संकेतस्थळ सत्यम.कॉम

इतिहास

संपादन

बी. रामलिंग राजू यांनी इ.स. १९८७ साली सत्यमची स्थापना केली. त्यावेळी सत्यम ही खाजगी कंपनी होती. इ.स. १९९१ साली सत्यमची नोंदणी मुंबई रोखे-विनिमय बाजारात झाली आणि इ.स. २००१ साली न्यू यॉर्क रोखे-विनिमय बाजारात ए.डी.आर. स्वरूपात झाली. इ.स. १९९१ साली कंपनीला पहिला फॉर्च्यून-५०० ग्राहक जॉन डीयर अँड कंपनीद्वारे मिळाला. नव्वदीच्या दशकात सत्यमने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळवत काही नवीन व्यवसायात उडी घेतली. याच प्रयत्नातून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत सत्यम इन्फोवे ही एक यशस्वी कंपनी बनली. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला सत्यमने भारताबाहेर कार्यालये थाटली आणि अतिशय वेगाने व्यवसायवृद्धी केली.

२००७-०८ आर्थिक वर्षात कंपनीची जगभरात ६६ ठिकाणी कार्यालये असून ५२००० कर्मचारी कंपनीच्या ६७० आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी काम करतात. सत्यम ही भारतातील माहिती तंत्रज्ञानक्षेत्रात महसुलानुसार क्रमांक ४ची कंपनी आहे

आर्थिक घोटाळा

संपादन

जानेवारी ७, इ.स. २००९ रोजी बी. रामलिंग राजूनी सत्यमने गेली अनेक वर्षे आपल्या ताळेबंदात घोटाळे केल्याचे मान्य केले व आपल्या पदांचा राजीनामा दिला.[] त्यानंतर राम मायनापतीनी सत्यमचे नेतृत्व हाती घेतले.

जागतिक कार्यालये आणि विकसन केंद्रे

संपादन

बंगळूर, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे, विशाखापट्टणम

आशिया-प्रशांत

संपादन

हाँग काँग , जपान, मलेशिया, सिंगापुर, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड

युरोप

संपादन

बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रांस, जर्मनी, हंगेरी, आयर्लंड, इटली, नेदरलंड, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम

उत्तर अमेरिका

संपादन

कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने

दक्षिण अमेरिका

संपादन

ब्राझिल

मध्य पूर्व आशिया

संपादन

संयुक्त अरब अमिराती

आफ्रिका

संपादन

दक्षिण आफ्रिका, मॉरिशस

सेवा आणि उत्पादने

संपादन

माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रे (Information Technology Services)

संपादन
पायाभूत सुविधा व्यवस्थापन (Infrastrcuture Management Services)
व्यवसाय आणि उद्योग सेवा (Business and Enterprise Solutions)
एकात्मिक अभियांत्रिकी सेवा (Integrated Engineering Solutions)

उद्योग क्षेत्रे

संपादन
बँकिंग (Banking)
वित्त सेवा (Financial Services)
उर्जा-साधनसंपत्ती सेवा (Energy and Utilities)
सार्वजनिक सेवा (Public Services)
आरोग्य आणि आयुर्शास्त्र (Healthcare and Life Science)
उच्च तंत्रद्यान (Hi-Tech)
विमा (Insurance)
उत्पादन (Manufacturing)
किरकोळ व्यापार आणि ग्राहकोपयोगी वस्तु (Retail and Consumer Goods)
दुरसंचार (Telecom)
प्रवास आणि परिवहन (Travel and Logistics)
माध्यमे आणि मनोरंजन(Media and Entertainment)
संरक्षण(Defense)
रसायनी(Chemical)
  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/Satyam_A_Rs_7000_crore_lie/articleshow/3949109.cms