पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती

पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती

पोर्तुगीज भारत (पोर्तुगीज: Índia Portuguesa किंवा Estado da Índia;) या पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती होत्या.

भारतातील पोर्तुगीज राज्य
Estado da Índia
[[दिल्ली सल्तनत|]]  
[[मुघल साम्राज्य|]]
इ.स. १५१०इ.स. १९६१ [[भारत|]]
ध्वज चिन्ह
राजधानी नोवा गोवा (कोच्ची इ.स. १५३० पर्यंत)
शासनप्रकार वसाहती शासन
राष्ट्रप्रमुख पहिला मानुएल (पहिला; राजा)
अमेरिको टोमास (अंतिम; अध्यक्ष)
अधिकृत भाषा पोर्तुगीज
इतर भाषा कोकणी, गुजराती, मराठी, मल्याळम
राष्ट्रीय चलन पोर्तुगीज भारतीय रुपया
पोर्तुगीज भारतीय एस्कुदो

वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ.स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई. इ.स. १७५२ साली मोझांबिकास अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. इ.स. १८४४ साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने मकाव, सोलोरतिमोर येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. इ.स. १९५४ साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर इ.स. १९६१ सालातील डिसेंबरात गोवा, दीवदमण या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता इ.स. १९७५ साली मिळाली. याकाळा पासून पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले.

सोळावे शतक

संपादन

पोर्तुगीजांनी १५३० सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे. त्या वर्षी ॲंतोनियो दि सिल्व्हेरियाने वसई शहर लुटून जाळले आणि तेथून तो पुढे मुंबईच्या बेटांवर चालून गेला. पोर्तुगीजांसमोर हार पत्करून ठाण्याच्या राजाने माहीमसह मुंबईतील बेटे पोर्तुगीजांच्या हवाली केली..[१] पुढील वर्षी गुजरातच्या बादशहा बहादुरशाहने दीवचे बेट पोर्तुगीजांना न दिल्यामुळे अंतोनियो दि साल्दान्हाने पुन्हा एकदा वसई लुटली.

१५३३मध्ये दियोगो दि सिल्व्हेरियाने वांद्र्याच्या बेटापासून गुजरातमधील सुरते पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दिसेल ते शहर बेचिराख केले. या मोहीमेत त्याने ४,००० गुलाम आणि अमाप संपत्ती लुटून आणली..[२] पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.

हेसुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ https://www.colonialvoyage.com/portuguese-bassein-bacaim-vasai/#
  2. ^ "Vasai Fort - Bassein Fort – Solotravellers". www.thesolotravellers.in. Archived from the original on 2019-05-22. 2018-03-14 रोजी पाहिले.