माहिम

(माहीम या पानावरून पुनर्निर्देशित)

माहीम हा मुंबई शहराचा एक भाग आहे. हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. ह्या भागांना मुंबईतील तालुका म्हणतात. माहीम रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेवरील मुंबई शहरातले शेवटचे स्थानक आहे. त्यानंतर मुंबईची वांद्रे आदी उपनगरे सुरू होतात.

माहीम is located in मुंबई
माहीम
माहीम
माहिम

इतिहास

संपादन

मुंबई शहर ज्या सात बेटांनी बनलेले आहे, त्यापैकी एक म्हणजे माहीम. जुने माहीम किंवा महिकावती ही राजा भीमदेवाची राजधानी होती. त्याने तेराव्या शतकात ह्या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि एक राजवाडा बांधला. प्रभादेवी येथील एका न्यायालयाचे आणि बाबुलनाथ देवळाचेही बांधकाम त्याच्या कारकिर्दीत झाले. हे जुने माहीम उर्फ केळवा माहीम उर्फ के.माहीम उर्फ महिकावती शहर मुंबईपासून ६० किलोमीटरवर पालघर जवळ आहे. महिकावती देवीचे प्राचीन मंदिर अजूनही तेथे आहे. रामाला आणि लक्ष्मणाला अभिरावण आणि महिरावण या दोघांनी ह्या देवळात बंदी केले होते असा उल्लेख रामायणात आहे, असे म्हणतात. हनुमानाने त्यांची येथून सुटका केली होती. जेव्हा राजा भीमदेव युद्धात पराजित झाला तेव्हा त्याने मुंबई जवळ आपली नवीन राजधानी बनवून तिचेसुद्धा नाव माहीम ठेवले, असे जुन्या माहीमकरांचे म्हणणे आहे.

माहीम हे मुंबईमधील सात बेटांमध्ये मोडत असून येथे कोळी लोकांचे कोळीवाडे आहेत. येथील समुद्र किनाऱ्यावर माहीम कॉजवे (कोळीवाडा), माहीम किल्ला, माहीम रेती बंदर, माहीमची खाडी, सेंट मायकल चर्च (माहीम चर्च), मखदूम शाह बाबा दर्गा, माहीम पोलीस ठाणे आणि त्यांची वसाहत, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, महापौर निवास, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शितळादेवी मंदिर, हिंदुजा रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेंट झेवियर कॉलेज आणि कापड बाजार (माहीम बाजार) आहेत. माहीम वांद्रे भागाला माहीमच्या काॅजवेने जोडले आहे.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

माहीम येथील प्रेक्षणीय स्थळांमध्ये जुन्या वास्तुशैलीत असणारे मुंबईतील सर्वात जुने शितळादेवीचे मंदिर अंदाजे सन १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी बांधले. माहीमध्ये सेंट मायकल चर्च नावाचे एक कॅथॉलिक चर्च आहे, माहीम चर्च म्हणून ते ओळखले जाते. माहीममध्ये बाबा मखदूम शाह दर्गा (माहीमचा दर्गा) आहे हे तिन्ही प्रार्थनास्थळे एका त्रिकोणाच्या टोकांवर येतात. माहीम कॉजवेच्या जवळ स्वामी विवेकानंद उद्यान आहे. संयुक्त महाराष्ट्र कलादालन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय जलतरण तलाव येथेच आहे, आणि त्याचबरोबर मनमाला देवीचे मंदिर आहे. ज्याला माहीम निसर्ग उद्यान या नावाने ओळखले जाते, ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान धारावी-शींव (सायन) येथे माहीमच्या पूर्वेला आहे.

प्रसिद्ध लोकवस्ती

संपादन

वीर सावरकर मार्ग,

माहीम चर्च,

शितळादेवी मंदिर,

सिटी लाईट सिनेमा,

माहीम कॉजवे कोळीवाडा,

सागर सानिध्य चाळ,

माहीम मच्छिमार वसाहत,

माहीम पोलीस वसाहत,

मोहंमद छोटानी मार्ग,

मोगल लेन,

भांडार गल्ली,

मोठा दर्गा,

छोटा दर्गा,

मोरी रोड,

नथुसेठ वाडी,

कापड बाजार (माहीम बाजार),

मखदूम शाह बाबा दर्गा: माहीमचा दर्गा (मोठा दर्गा),

माहिम किल्ला,

भागोजी कीर मार्ग,

टायकल वाडी.