माहिम किल्ला

(माहीम किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

माहीमचा किल्ला हा माहीम, मुंबई, येथे माहीमच्या खाडीजवळ आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. हा किल्ला सध्या सभोवतालच्या झोपडपट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणामु़ळे सुस्थितीत नाही, दुर्लक्षिल्यामुळेही वास्तूची स्थिती दयनीय झाली आहे.

माहीमचा किल्ला

इतिहास

संपादन

महिकावतीच्या बखरीत माहिमचा उल्लेख आला आहे, जेंव्हा केळवे माहिम ह्या राजधानीच्या गावातील बिंब राजाची सत्ता शिलाहारांनी नष्ट केली तेंव्हा बिंब राजाने मुंबईतल्या माहिममध्ये दुसरी राजधानी वसवली.

इ.स. १५१६ मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश केला आणि माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातच्या अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. शेवटी पोर्तुगीजांनी हा किल्ला इ.स. १५३४ मध्ये जिंकून घेतला. हाच किल्ला पुढे इ.स. १६६१ मध्ये पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला.[ संदर्भ हवा ] हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, कारण हाच किल्ला त्यांना पोर्तुगीजांच्या आणि नंतर मराठ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण देऊ शकत होता.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन