ट्रेक द सह्याद्रीज हे हरिश कापडिया यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातील साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या २००४ सालापर्यंत ५ आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तकात १३ नकाशे आणि ६६ छायाचित्रे आहेत.

'ट्रेक द सह्याद्रीज'

Trek the Sahyadries
लेखक हरीश कापडिया
भाषा इंग्रजी
देश भारत
साहित्य प्रकार डोंगरी वाटांविषयक / प्रवासवर्णन
प्रकाशन संस्था एम.एल्.गिडवानी Indus Publishing
प्रथमावृत्ती १९७७
चालू आवृत्ती २००४
मुखपृष्ठकार गीता कापडिया
पृष्ठसंख्या १७६
आय.एस.बी.एन. ८१-७३८७-१५१-५
सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य

पुस्तकाचे तपशीलात वर्णन

संपादन
 • लेखकाचे मनोगत

हिमालयातील पर्वतात पदभ्रमण किंवा गिरिभ्रमण केल्यावर लेखकाच्या मनात सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील किल्ले याबद्दल असलेली आस्था वाढती राहते. हरिश कापडिया यांनी त्यांच्या नवांग या मुलासह केलेल्या सह्याद्रीतील भटकंतीचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले असून हे पुस्तक त्यांनी आपल्या मुलाला समर्पित केले आहे.सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील समृद्ध निसर्गवैभव अनुभवावे यासाठी लेखकाने भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांना मार्गदर्शक असे हे पुस्तक लिहिले आहे.[१]

 • प्रकरण पहिले- प्रस्तावना-

सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याची सर्व भौगोलिक माहिती, समुद्रसपाटीपासून असलेली उंची, निसर्ग याची माहिती प्रस्तावना या भागात आहे. गिरिभ्रमण हा केवळ छंद राहिला नसून त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देणा-या तसेच पूरक अन्य प्रशिक्षण देत असलेल्या लहान मोठ्या वर्गांची आणि प्रशिक्षण संस्थानची माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे. सह्याद्रीचा मध्यभाग, उत्तरं आणि दक्षिण भाग तसेच मुंबई आणि पुण्याचा जवळपासचा प्रदेश याबद्दल येथे माहिती दिलेली आहे.

 • प्रकरण दुसरे- आवश्यक माहिती- दुर्गभ्रमंती तसेच गिर्यारोहण करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी प्रवासाच्या आणि सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या प्रकरणात सांगितलेल्या आहेत. यामध्ये वाहतुकीची विविध पर्यायी साधने, रुग्णालये, विश्रांतीगृहे यांची माहिती दिलेली आहे. भाषा , संस्कृती, स्थानिक विशेष उत्सव , खान- पान सुविधा अशी आवश्यक माहिती नोंदविलेली आहे. सह्याद्रीतील घाटमार्ग, धार्मिक स्थळे यांचीही माहिती दिलेली आहे. या बरोबरच येथील पर्यावरण कसे आहे याचीही माहिती उपलब्ध करून दिली आहे.[१]
 • प्रकरण तिसरे- भ्रमंतीला सुरुवात करताना- कोणती काळजी घ्यावी यांच्या सूचना या प्रकरणात आहेत.
 • प्रकरण चौथे- प्रत्यक्ष गिरीभ्रमण करताना घ्यावयाची काळजी व मौलिक सूचना या प्रकरणात दिलेल्या आहेत.
 • प्रकरण पाचवे- सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याच्याशी संबंधित मराठयांचा इतिहास या प्रकरणात सांगितली आहे.
 • प्रकरण सहावे- कर्जत प्रांत - ठाणे, माथेरान, चौक आणि कर्जत भागातील किल्ल्यांची माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे.
 • प्रकरण सातवे-कोकण प्रांत- उत्तर व दक्षिण कोकणातील किल्ले आणि कोकणातील वैशिष्ट्य असलेले सागरी किल्ले अशी माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे.
 • प्रकरण आठवे- नाशिक प्रांत - सेलबरी रांग, सातमाळा रांग, चांदवड रांग आणि अजिंठा-सातमाळा रांग यातील किल्ले यांची माहिती या प्रकरणात आहे.
 • प्रकरण नववे- इगतपुरी प्रांत - कसारा, त्रंबकेश्वर, उत्तर आणि दक्षिण इगतपुरी, कळसूबाई आणि बालेश्वर पर्वतरांगा यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
 • प्रकरण दहावे- माळशेज प्रांत- माळशेज आणि नाणेघाट तसेच मीना आणि घोरी नद्यांच्या द-या यातील भागाची माहिती या प्रकरणामध्ये आहे.
 • प्रकरण अकरावे- लोणावळा प्रांत- राजमाची परिसर , पवना मावळ भाग आणि मांडवी पर्वतरांग या परिसराचे माहिती यात आहे.
 • प्रकरण बारावे- पुणे प्रांत- भुलेश्वर रांग, भोर आणि वाई प्रांत या भागाची माहिती यामध्ये आहे.
 • प्रकरण तेरावे- कोयना-सातारा प्रांत- या प्रकरणामध्ये शंभू महादेवाची पर्वतरांग या बद्दल माहिती आहे. .
 • प्रकरण चौदावे- वारणा - आंबोली प्रांत - आष्टा, पन्हाळा, आंबोली पर्वतरांगांमध्ये असलेल्या किल्ल्यांची माहिती या प्रकरणामध्ये आहे.
 • प्रकरण पंधरावे- मुंबई परिसर - मुंब्रा आणि कान्हेरी येथील लेण्यांची माहिती तसेच कातळ चढाई प्रकाराची माहिती यामध्ये आहे.[१]

संदर्भ

संपादन
 1. ^ a b c Kapadia, Harish (2004-03). Trek the Sahyadris (इंग्रजी भाषेत). Indus Publishing. ISBN 9788173871511. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन