गेवराई तालुका

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील, तालुका
(गेवराई या पानावरून पुनर्निर्देशित)


गेवराई तालुका हा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील तालुका आहे. हा गोदावरी नदीच्या काठावर असून या तालुक्यात कापूस हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेवराई शहर हे बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. गेवराईचे पूर्वीचे नाव गवराई असे होते.गेवराई पासून १२ किमी वर तलवडा आहे. गेवराई तालुक्यात राक्षसभुवन गोदावरीकाठी वसलेले गाव आहे.इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठेहैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. पाडळसिंगी हे गेवराई तालुक्यातील गाव आहे. या खेड्यातुन रा.म. २११ हा रस्ता जातो.

  ?गेवराई तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर बीड
विभाग औरंगाबाद
भाषा मराठी
तहसील गेवराई तालुका
पंचायत समिती गेवराई तालुका
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४३११२७
• MH-23

स्थान व विस्तार

संपादन

तालुक्‍याचे एकूण क्षेत्रफळ – १४५५.६४ चौरस किलोमीटर ग्रामिण क्षेत्रफळ - १४५१.३४ चौरस किलोमीटर नागरी क्षेत्रफळ – ४.३० चौरस किलोमीटर

भौगोलिक महत्त्व

संपादन

गेवराई तालुका हा समुद्रापासून दूर आहे. गेवराई तालुक्‍यातील बराच भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे, मात्र तालुक्‍याचा उत्तर भाग सपाट मैदानी आहे. उत्तरेकडील गोदावरी नदीखोऱ्याचा पश्चिम भाग आहे.त्या पासून साधारण ५५५ मी. उंचीचा असून पूर्वेकडे त्याची उंची ४०० मी. पर्यंत उतरत जाते. या सखल प्रदेशात मधून ६०० मी उंचीच्या काही टेकड्याही आढळतात. याच्या पश्चिम भागात गणोबा, चितोरा व सिंदफणा नदीच्या दक्षिण भागात नारायणगड इ. टेकड्या आहेत
हा तालुका दख्खनच्या पठारी प्रदेशात असून गोदावरी नदीखोऱ्याचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या प्रदेशात गडद करड्या व काळ्या रंगाची मृदा आढळते. या जमिनीत भेगा पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जमीन थोडी क्षारयुक्त असून क्षारांचे प्रमाण ५% आहे. नद्यांच्या काठी जमीन सुपीक, तर इतरत्र पातळ थराची व खडकाळ आढळते.

हवामान

संपादन

तालुक्‍याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. स्थळपरत्वे तालुक्‍याच्‍या हवामानात थोडाफार फरक आढळतो. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. तालुक्‍याच्‍या पश्चिम भागातील उंचावरील डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. तालुक्‍यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे तालुक्‍यातील बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे.

इ.स.१९७७ मध्ये तालुक्‍याचे सरासरी कमाल तापमान ३९.४o सेल्शियस व सरासरी किमान तापमान २९.९o सेल्शियस होते. वार्षिक पावसाचे प्रमाण कमी असून तो सरासरी ६५ ते ८० सेमी. आहे. तालुक्‍याच्‍या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या तालुक्‍याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो.

निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे तालुक्‍यात धावडा, आपटा, आवळा, सलाई, तेंदू, चंदन, टेम्‍रू, कांदोळ, लोखंडी, खैर, मोह(महुवा), पळस, हेन इ. येथील प्रमुख वनस्पति प्रकार होत. तालुक्‍यात कुसळी गवतशेडा गवत हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात. पीक,:शेतीमध्ये कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मूग, ऊस, डाळींब, तूर इ. पिके घेतली जाते

जलसिंचन

संपादन

तालुक्‍यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. तालुक्‍यातील दक्षिण, पूर्व व पश्चिम भाग हा कोरडवाहू जमीनीने जास्‍तीत-जास्‍त व्‍यापलेला आहे. या उलट उत्‍तरेला गोदावरी व उजवा कालवा आसल्‍यामुळे हा भाग बागायती जमीनीचा भाग म्‍हणुन ओळखला जातो.

नद्या

संपादन

गोदावरी ही तालुक्‍यातील प्रमुख नदी असून ती तालुक्‍याच्‍या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती गेवराई तालुक्‍यातून माजलगावपरळी तालुक्‍यात वाहत जाते. सिंदफणा ही तालुक्‍यातील एक महत्‍वाची नदी असून ती तालुक्‍याच्‍या दक्षिण सीमेवरून वाहते. काही काही अंतर पूर्वेला वाहत गेल्‍यानंतर ही नदी माजलगाव तालुक्‍यात प्रवेश करते. पुढे याच नदीवर माजलगाव धरण बांधण्‍यात आलेले आहे. या नदीची वाहण्‍याची दिशा पश्चिमेकडून पेर्वेकडे अशी आहे. तालुक्‍यात सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.

लोकसंख्‍या

संपादन
  • तालुक्‍याची एकूण लोक संख्‍या –२६२५४०
  • ग्रामिण लोकसंख्‍या -२३४०४८
  • नागरी लोकसंख्‍या -२८४९२
  • पुरूष लोकसंख्‍या -१३४१७०
  • महिला लोकसंख्‍या -१२८३७०
  • ० ते ६ वर्ष वयोगटातील लोकसंख्‍या- १४%
  • लोकसंख्‍येची घनता - १८०
  • एकूण साक्षरता दर - ६७.००
  • पुरूष साक्षरता दर - ७६.००
  • महिला साक्षरता दर - ५८.००

जनगणना सन २०११ नुसार लोकसंख्या

संपादन

शिक्षण सुविधा

संपादन

शाळा व महाविद्यालये

संपादन
  • र.भ. अट्टल महाविद्यालय गेवराई.

भागुजीराव ढेकळे महाविद्यालय पाडळसिंगी.

  • जयभवानी कॉलेज गढी कारखाना.
  • नूतन कोळेश्वर विद्यामंदिर कोळगाव.

आरोग्य सेवा

संपादन
बीड जिल्ह्यातील तालुके
बीड तालुका | किल्ले धारूर तालुका | अंबाजोगाई तालुका | परळी वैजनाथ तालुका | केज तालुका | आष्टी तालुका | गेवराई तालुका | माजलगाव तालुका | पाटोदा तालुका | शिरूर तालुका | वडवणी तालुका