संभाजीनगर विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. [ओरंगाबाद ] विभाग, मराठवाडा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद विभाग नकाशा

चतुःसीमासंपादन करा

या विभागाच्या पश्चिमेस पुणे विभाग,पूर्वेस अमरावती विभाग, उत्तरेस नाशिक विभाग आणि अमरावती विभाग व दक्षिणेस तेलंगणा राज्य आहेत.

इतिहाससंपादन करा

प्राचीन काळी हा मौर्य साम्राज्याचा एक भाग होता. नंतर हा भाग सातवाहन राजांच्या ताब्यात होता. नन्तर औरंगाबाद विभाग हा मुख्यत्वेकरून इस्लामिक राजवटीखाली होता. इ.स. सन १७२४ला निजामाने मराठवाडा, तेलंगण व सध्याच्या कर्नाटक राज्यातील काही भाग मिळून स्वतन्त्र हैदराबाद राज्य स्थापन केले. नन्तर १९४७ मध्ये भारताला स्वातत्र्य मिळाल्यानन्तर इथल्या जनतेला स्वातन्त्र्य मिळाले नाही. तर त्यांना मराठवाड्यासाठी वेगळा लढा द्यावा लागला. निजामावर जेंव्हा भारत सरकारने लष्करी कारवाई केली तेंव्हा मराठवाडा स्वतन्त्र झाला.१९४८ मध्ये स्वतन्त्र हैदराबाद राज्य अस्तित्वात आले.पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रान्तरचनेनूसार हे राज्य तीन भागात विभागले गेले.ज्यातील मराठवाडा हा भाग तेंव्हाच्या मुम्बई राज्याला जोडण्यात आला आणि पुढे १९६०ला प्रामुख्याने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

थोडक्यात माहितीसंपादन करा