अमरावती विभाग
महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभाग
अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
चतुःसीमा
संपादनया विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि तेलंगणा आहेत.
थोडक्यात माहिती
संपादन- क्षेत्रफळ - ४६,०९० किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - ३९,४१,९०३
- जिल्हे - अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा
- साक्षरता - ७७.७९%
- ओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²