हिंगोली जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.
हा लेख हिंगोली जिल्ह्याविषयी आहे. हिंगोली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्याहिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हायवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.

हिंगोली जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
हिंगोली जिल्हा चे स्थान
हिंगोली जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय हिंगोली
तालुके औंढा नागनाथसेनगांवकळमनुरीवसमतहिंगोली
क्षेत्रफळ
 - एकूण ४,५२७ चौरस किमी (१,७४८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,७८,९७३ (२०११)
-लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १,७८,७३३
-साक्षरता दर ७६.०४%
-लिंग गुणोत्तर ९४२ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर
-लोकसभा मतदारसंघ हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ हिंगोली,वसमत, कळमनुरी
-खासदार हेमंत पाटील
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ९० मिलीमीटर (३.५ इंच)
प्रमुख_शहरे हिंगोली, वसमत, कळमनुरी
संकेतस्थळ

हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी. आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान आहे. येथे पौष पौर्णिमेला यात्रा सुरू होते. खुप ठिकणांवरून येथे भाविक येतात. कुरुंदा गावाजवळील टोकाई माता मंदिर,आंबा येथील अंबादेवी मंदिर, करंजाळा गावातील सीमा भागात बाराशिव येथील हनुमान मंदिर व जुनी बाराव आहे यात पंचमुखी महादेव अर्ध मुर्ती आहे मिती माघ शुक्ल पौर्णिमेला यात्रा भरते येते बारा गावांच्या शिव एकत्रित येतात व औंढा नागनाथ व वसमत सीमेवरील मंदिर आहे, बोराळा येथील हनुमान मंदिर व चोंडी बहिरोबा येथील बहीरोबा देवस्थान इ.

शिवतीर्थ वसमत

वारंगा मसाई हे गाव हिंगोली पासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. आणि तालुका कळमनुरी पासून १० किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव मसाई माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावांमध्ये पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी एक मोठी यात्रा भरते. हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी घेरलेले आहे.

वारंगा मसाई गावातील मंदिरे
मसाई देवी मंदिर, हनुमान मंदिर, संत सावता माळी मंदिर, डागेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर.

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

संपादन
 • भवानी मंदिर वारंगा
 • संत तुकामाई जन्मस्थान सुकळीविर
 • संत तुकामाई समाधीस्थळ येहळेगाव
 • औंढा (नागनाथ)
 • संत नामदेव महाराज नर्सी
 • स्वयंभू जटाशंकर डोंगरकडा
 • बाराशिव मारुती
 • सिद्धेश्वर धरण

हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे

संपादन

हिंगोली जिल्ह्यात पुढील प्रमाणे प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे आहेत.


 • औंढा नागनाथ- बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे.
 • मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर (शिरड शहापूर),
 • तुळजादेवी संस्थान (घोटा - ता. हिंगोली),
 • संत नामदेवांचे जन्मस्थान नरसी नामदेव.
 • ग्रामदैवत श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा
 • शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर.
 • समगा येथील संगमेश्वर महादेव मंदिर
 • श्री.कानिफनाथ गड खैरी घुमट
 • चिंतामणी गणपती (हिंगोली)
 • सिद्धनाथ (महादेव) मंदिर [१]
 • वारंगा मसाई- मसाई देवीचे मंदिर
 • संत तुकामाई जन्मस्थळ सुकळीविर(तु)
 • हेमाडपंथी भैरवनाथ महाराज मंदिर ब्रम्हपुरी
 • संत तुकामाई समाधीस्थळ येहळेगाव(तु)
 • श्री संत देवकामाता संस्थान हिवरा तर्फे जवळा (ता.कळमनुरी)
 • हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथे श्री प्रतापगिरी महाराज देवस्थान असून तिथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला फार मोठा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते ह्या अखंड हरिनाम सप्ताहास पासष्ट वर्षाची परंपरा लाभलेली आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाचे उत्सव

संपादन
 • सार्वजनिक दसरा महोत्सव - सुमारे दोनशे वर्षांपासून
 • सार्वजनिक गणेशोत्सव
 • शिवजयंती
 • महात्मा फुले जयंती औंढा नागनाथ
 • बैलपोळा
 • श्री नवदुर्गा महोत्सव
 • भीम जयंती
 • नागपंचमी
 • कलगावची यात्रा
 • हत्ता नाईक ता. सेनगांव येथील कावड आगमन
 • श्री. कानिफनाथ महाराज यात्रा कानिफनाथ महाराज गड खैरी घुमट
 • हिंगोलीचा प्रसिद्ध नवसाच्या मोदकाचा चिंतामणी गणपतीचा मोदक उत्सव
 • मसाई देवी यात्रा. वारंगा मसाई

जिल्ह्यातील तालुके

संपादन

हिंगोली जिल्ह्यातली गावे

संपादन
 • सुकळीवीर(तु)
 • दांडेगाव
 • साखरा
 • आडगाव
 • बटवाडी
 • खांबाळा
 • वटकळी
 • गिलोरी
 • गोरेगाव
 • ताकतोडा
 • गोंदनखेडा
 • केंद्रा बुद्रूक
 • वरखेडा
 • दाताडा बुद्रूक
 • वाघजाळी
 • गारखेडा
 • माझोड
 • सवड
 • पहेणी
 • वैजापूर
 • वरूड काझी
 • वरूड चक्रपान
 • देऊळगाव रामा
 • आंधरवाडी
 • माळहिवरा
 • सिरसम
 • काळकोंडी
 • गारमाळ
 • भांडेगाव
 • साटंबा
 • जामठी खुर्द
 • जामठी बुद्रूक
 • सावा
 • नवलगव्हाण
 • भानखेडा
 • हनवतखेडा
 • कडती
 • पांगरी
 • ब्रम्हपुरी
 • पुसेगाव
 • डिग्रस
 • इंचा
 • कडोळी
 • नांदूरा
 • ऊमरा
 • ईडोळी
 • बोराळा
 • पळशी
 • खानापूर चित्ता
 • सवना
 • Bramhanwada (pra. washim)
 • पारडा
 • पिंपळखुटा
 • बळसोंड
 • केसापुर
 • लोहगाव
 • खरबी
 • आखाडा बाळापूर
 • बासंबा
 • हत्ता नाईक
 • आजेगाव
 • आंबा
 • आसेगाव
 • उंडेगाव : [२]
 • एरंडेश्वर
 • पान कन्हेरगाव
 • कळमनुरी
 • कुरुंदा
 • गिरगाव
 • गुंज
 • गुंडा
 • धामणी
 • वसई
 • चोंढी
 • जवळा पांचाळ
 • जवळा बाजार
 • जवळा बुद्रूक
 • सेंदुरसना
 • टेंभुर्णी
 • डोंगरकडा
 • हिवरा तर्फे जवळा
 • तपोवन
 • नरसी (नामदेव) : [३]
 • पळसगाव
 • पांगरा सती
 • पांगरा शिंदे
 • बसमत
 • बाराशीव[४]
 • बाभुळगाव
 • येळेगाव तुकाराम
 • समगा [५]
 • रामेश्वर : [६]
 
रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली
 • हट्टा
 • रामेश्वर तांडा
 • जयपुर
 • माळसेलू
 • बेलवाडी
 • खरबी
 • वाकोडी
 • तळणी
 • शिंदेफळ
 • पारोळा
 • सेनगाव
 • वाढोणा
 • थोरजवळा
 • कणका
 • शिरड शहापूर
 • शेवाळ
 • कहाकर खुर्द
 • कहाकर बुद्रूक
 • सिनगी(नागा)
 • सिनगी(खांबा)
 • सुकळी
 • हिंगोली
 • वारंगा मसाई
 • कोर्टा
 • वाई गोरखनाथ
 • धामणगाव
 • पांगरा बोखारे
 • खैरखेडा
 • शेगांव खोडके (हे गाव सेनगाव तालुक्यात असून मराठवाड्याच्या सीमेवर आहे. येथुन विदर्भाची सीमा चालू होते)

संदर्भ

संपादन
 1. ^ गांगलवाडी येथे सिध्देश्वर धरणाजवळ सिद्धनाथाचे (महादेवाची पींड) मंदिर आहे. येथुन औढा नागनाथ ज्योतिर्लिंग पर्यंत बोगदा होता असे ज्ञात आहे. दरवर्षी येथे सलग सात दिवस भव्य यात्रेसह होम आयोजन होते.
 2. ^ औंढा-जिंतूर रोडवर हिवरखेडा गावाच्या दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर उंडेगाव हे गाव आहे.या ठिकाणी दत्तात्रेयाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
 3. ^ संत नामदेव यांचे जन्म गाव. केशीराजाचे मंदिर आजही तेथे आहे.
 4. ^ येथे हनुमानाचे मंदिर आहे. बारा गावांच्या सीमा तेथे आल्याने त्यास बाराशीव हे नाव पडले आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.
 5. ^ येथे श्री संगमेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे
 6. ^ औंढा-जिंतूर रोडवर औंढा नागनाथ पासून २० कि.मी. अंतरावर हे गाव आहे. रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

बाह्य दुवे

संपादन
हिंगोली जिल्ह्यातील तालुके
हिंगोली तालुका | सेनगाव तालुका | कळमनुरी तालुका | वसमत तालुका | औंढा नागनाथ तालुका