माजलगाव तालुका
माजलगाव तालुका हा बीड जिल्ह्यामध्ये येतो.
?माजलगाव महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | बीड |
तालुका/के | माजलगाव |
लोकसंख्या | ४९,४५३ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३११३१ • +०२४४३ • MH-४४ |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
प्रमुख ठिकाणे
संपादन- माजलगाव धरण: माजलगावाजवळ सिंधफणा नदीवर हे धरण आहे. माजलगाव धरण जायकवाडी प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला जागतिक बँकेने अर्थसाहाय्य दिले आहे. पहिल्या टप्प्याचे काम इ.स. १९७० मध्ये सुरू झाले.
माजलगाव तालुक्याचे क्षेत्रफळ : ९३ हजार ६६४ हेक्टर लोकसंख्या : ४९४५३ गावे : १२५ माजलगाव हा बीड जिल्हाचा तालुका आहे.
माजलगावमधे सिंधफणा नदीवर असलेल्या धरणाची पाणी क्षमता पूर्णसंचय पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे.या धरणाच्या कामास १९७८ मध्ये प्रारंभ झाला, ते जून १९८४मध्ये पूर्ण झाले. माजलगाव धरणाला एक उजवा कालवा आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ३ हजार ८४० चौ.किमीआहे. या धरणात एकूण २२ गावे बुडित झाली आहेत.
माजलगाव धरणाची एकूण लांबी ६ हजार ३०० मीटर असून त्यात धरणमाथा ४३५.६० मीटर उंचीवर आहे. नदीपात्रात धरणाची उंची ३१ मीटर आहे. यामुळे १ लाख १९ हजार ४०० हेक्टर जमिनीवर लागवड करता येते. धरणाचा पाणीसाठा ४५ कोटी घन मीटर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.