जायकवाडी धरण

महाराष्ट्रातील धरण

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण(Jayakwadi dam). ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.[१]

जायकवाडी धरण

धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
गोदावरी नदी
स्थान पैठण, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस ७५५ मि.मी.
लांबी ९९९७.६७ मी.
उंची ४१.३ मी.
बांधकाम सुरू इ.स. १९६५
उद्‍घाटन दिनांक इ.स. १९७६
ओलिताखालील क्षेत्रफळ ३५००० हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता २१७० दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ ३५० वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता १२ मेगावॉट
नाथसागरावर अवलंबून क्षेत्र

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे

जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

धरणाची माहिती

संपादन

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ४१.३ मी. (सर्वोच्च)
लांबी  : ९९९७.६७ मी.

दरवाजे

संपादन

प्रकार : S - आकार
लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)

पाणीसाठा

संपादन

क्षेत्रफळ  : ३५० वर्ग कि.मी.
क्षमता  : २९०९ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३५०० हेक्टर
ओलिताखालील गावे  : १०५

कालवा

संपादन

डावा कालवा

संपादन

लांबी  : २०८ कि.मी.
क्षमता  : १००.८० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : २६३८५८ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २३७४५२ हेक्टर

उजवा कालवा

संपादन

लांबी  : १३२ कि.मी.
क्षमता  : ६३.७१ घनमीटर / सेकंद

वीज उत्पादन

संपादन
 
जायकवाडी धरण, पैठण

जलप्रपाताची उंची  : ९४ फूट
जास्तीतजास्त विसर्ग  : ५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : १२ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १


संदर्भ

संपादन
  1. ^ मंजिरी धर्माधिकारी. "Special Report: जयकुचीवाडी ते जायकवाडी, मराठवाड्याचा 'समुद्र' ते आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण, वाचा सविस्तर". Archived from the original on 2021-10-01. १ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.