शिरूर तालुका (बीड)

महाराष्ट्रातील गाव, भारत
(शिरूर तालुका, बीड जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

शिरूर किंवा शिरूर कासार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?शिरूर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: शिरूर कासार
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा बीड
कोड
पिन कोड

• 413249

शिरुर तालुक्यात अनेक छोटे मोठे गावे आहेत. काही गावाची नावे: खोकरमोहा बावी, येळंब रायमोहा, वंजारवाडी, तागडगाव, पाडळी, शिरुर तालुक्या अती रम्य परिसर आहेत. खोकर्मोहा हे तालुक्यातील एक शैक्षणिक केंद्र आहे खोकर्मोहा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये गणली जाते या शाळेची स्थापना १ जून १८६१ रोजी झालेली आहे. या शाळेमधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदस्थ अधिकारी आहेत. संत भगवानबाबा यांचे समाधीस्थळ असलेले भगवानगड हे पवित्र तीर्थक्षेत्र शिरूरहून १८ किमी. आहे. शिरुर तालुक्यातील वंजारवाडी येथुन जवळच असलेल्या येवलवाडी या ठिकाणी नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक असलेले श्री. कानिफनाथ यांचे गुरू श्री. जालिंदरनाथ यांची समाधी आहे.

शिरुर कासार पासून ९ कि.मि. अंतरावर सावरगांव चकला हे उंच टेकडीवर वसलेले गाव आहे. या गावात बंकटस्वामीचे शिष्य वै.ह.भ.प. गणपतभाऊ महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर आहे. शिरूर हे तालुक्याचे ठिकाण असून हे सिंदफना नदीच्या काठी वसलेले आहे. येथे हेमाडपंथी स्वरूपाचे प्राचीन सिद्धेश्वराचे मंदिर आहे. शिरूरपासून १० किमी. अंतरावर पाडळी हे गांव उथळा नदीजवळ वसलेले आहे. तागडगांव येथे छोटासा जलाशय असून याद्वारे शिरूरला पाणीपुरवठा होतो. कालीका देवीचे मंदिर ही या ठिकाणी आहे.

शिरूर(कासार) तालुक्यातील खालापुरी या गावाला पोलीसाचे गाव म्हणतात

वृत्तपत्रे: 'राष्ट्रनिर्माण' हे साप्ताहिक शिरूर कासार येथून प्रसिद्ध होते.