राक्षसभुवनची लढाई
राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निजामअली यांच्यात झाली. यात हैद्राबादच्या मुस्लिम निझामाचा दारुण पराभव झाला. राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामअलीचा दारुण पराभव केला. हिंदू राजांचा राक्षसी इस्लामी शासकांवर विजय म्हणून ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. या लाढाइमधे निजामाचे २२ सरदार कैद करण्यात आले होते. साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणा विठ्ठल सुंदर यांचा मृत्यु याच लढाई मधे झाला. याचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधि राक्षसभुवन मधे पुरातन महादेव मंदिर दादेश्वर समोर आजही पाहण्यास मिळते. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. [१][२][१]
दिनांक | ऑगस्ट १० १७६३ |
---|---|
स्थान | राक्षसभुवन, बीड, महाराष्ट्र, भारत |
परिणती | मराठ्यांचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
मराठा साम्राज्य | निजाम |
सेनापती | |
माधवराव पेशवे जानोजी भोसले रघुनाथराव पेशवे |
इस्माईलखान पन्नी राघोजी जाधवराव नानासाहेब निंबाळकर खर्डेकर जनरल बुसी (फ्रांस)
|
पार्श्वभूमी
संपादनहैदराबादच्या निजामाला उदगीरच्या लढाईत त्याने गमावलेला प्रदेश परत मिळवायचा होता. त्या लाढाईत निजामाचे सर्व सरदार मराठा सैन्याने मारले होते आणि त्याला हिंदूंकडून पराभव सहन करावा लागला होता. याचा वचपा काढण्यासाठी निजामअलीने मराठ्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेऊन पुण्यावर हल्ला केला आणि मोठी नासधूस केली होती. निजामाने थेट पुण्यावर हल्ला केला असल्यामुळे नागपूरकर भोसले ही निजामाविरुद्ध सज्ज झाले. या लाढाईमध्ये २५,००० जहागीरदारांचे सैन्य आणि इस्माईल खान पन्नी, राघोजी जाधवराव चतुर्थ आणि नानासाहेब निंबाळकर खर्डेकर यांच्या निष्ठावान फौजा सामील होत्या. निजामाला जनरल बुसीच्या फ्रेंच सैन्यानेही मदत केली होती. तथापि, मराठ्यांचे नेतृत्व श्रीमंत थोरले पेशवे माधवराव करत होते (चांभार गोंडाच्या चकमकीपर्यंत, सेनासाहेबसुभा जानोजी भोंसले आणि पेशव्याचे काका रघुनाथराव हे देखील सैन्य छावणीत होते), त्यांना विसाजी त्र्यंबक, सरदार नारो शंकर दाणी, बाबूजी नाईक (ए. सेनासाहेबसुभाचे नागपूरचे सेनापती, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी लढाईपूर्वी निजामाशी मैत्रीचा करार केला होता, सरदार मालोजीराजे तिसरे घोरपडे (कोपरगाव) आणि मुधोळचे सरदार यशवंतराव/संताजीराव वाबळे यांनी राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्याचा पराभव केला.
तह
संपादनशेवटी युद्धविराम झाला आणि संभाजीनगर येथे एक तह झाला, ज्यानुसार निजामाने भालकीसह आपला मोठा प्रदेश मराठ्यांना दिला. नेऊरगाव आणि लिंबागणेश हे भागही मराठा साम्राज्याचा भाग बनले. या निर्णायक विजयाने मराठे अधिक शक्तीशाली बनले आणि मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले.
परिणाम
संपादनया विजयामुळे मराठी साम्राज्य संपले नसून ते चिरकाल टिकू शकते, हा विश्वास मराठी फौजेत संचारला. या लढाईचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे पेशवेपद धारण केल्यानंतर थेट हातात तलवार घेऊन रणांगणावर लढलेली ही माधवराव पेशव्यांची पहिलीच लढाई होती.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "HISTORY – MARATHA PERIOD". Nasik District Gazetteer. 4 September 2010 रोजी पाहिले.
- ^ "'आत्मविश्वास देणारी राक्षसभुवनची लढाई विस्मृतीत..'". archive.loksatta.com. 2022-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-13 रोजी पाहिले.
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल २९, २००५ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)