राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या तीर्थक्षेत्री शनिदेवाचे प्रथम पीठ प्रसिद्ध आहेच,१७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. या लाढाइमधे निजामाचे २२ सरदार कैद करण्यात आले होते. साडेतीन शाहन्यांपैकी एक शाहाना विठ्ठल सुंदर यांचा मृत्यु याच लढाई मधे झाला याचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधि राक्षसभुवन मधे पुरातन महादेव मंदिर दादेश्वर समोर आजही पहन्यास मिलते.राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. [] []

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे गाव शनीमहाराज यांच्या बरोबरच दत्त प्रभूंच्या जन्म स्थानामुळे प्रसिद्ध असून याठिकाणी सहा दिवस पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म सोहळा शेकडो वर्षांपासून साजरा होत आहे. दत्त संस्थानामुळेही ते तितकेच प्रसिद्ध आहे. आत्मानुभूती प्राप्त करून देणारे आत्मतीर्थ, अगस्तीतीर्थ, नृसिंहतीर्थ, भारतातील प्रख्यात 21 गणपतींपैकी एक विज्ञान गणेशतीर्थ, सोमेश्वरतीर्थ, कालिकातीर्थ अशी आठ तीर्थेदेखील प्रसिद्ध आहेत.अशा या पवित्र क्षेत्री गोदावरी तीरावर अतिशय प्राचीन असे 'दत्तस्थान' आहे. या स्थानी प्राचीन काळी दंडकारण्य होते, असा उल्लेख पुराणात आढळतो. दत्त प्रभूंना दत्त अत्रे, असे नाव याठिकाणी प्राप्त झालेले आहे. अत्री अनुसया यांचा आर्शम याठिकाणी असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. या स्थानावर त्यांना पुत्रसुख अनुभवता आले, असे भाविक सांगतात. पूर्वी हा दंडाकारणाचा भाग असल्यामुळे अत्री, अगस्ती, दाक्षीची, पिपल्लाद, दक्षप्रजापती महर्षी गोतम आदी मान्यवर ऋषी याठिकाणी वास्तव्यास होते. याचस्थानी वनवासात असतांना प्रभू रामचंद्रांनी सीतामातेसह दत्त दर्शन झाल्याचा उल्लेख रामविजय ग्रंथात आढळतो. संपूर्ण वनवासात प्रभू रामचंद्र एकाच स्थानावर दोन वेळा येऊन गेले असे एकच ठिकाण येथे आहे. सती हरणापुर्वी व सिता हरणानंतर शनी देवता स्थापनेवेळी अन्य कोणत्याही स्थानावर प्रभू रामचंद्र दोन वेळा गेलेले नाहीत. ज्या दत्त मूर्तीचे व अवतरणाचे वर्णन सुंदरतेने करण्यात आलेले आहे. याक्षेत्रावर दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) यांनी गोदा दक्षिणेच्या वेळी वास्तव्य केल्याचे आढळते. अशा या प्राचिन दत्त संस्थानाची माहिती कमी दत्त भक्तांना आहे. या स्थानावर शिखर नसलेले आर्शमाप्रमाणे रचना असलेले एकमुखी षडभूज दत्ताची मूर्ती खोल गाभाऱ्यात आहे. कारण माता अनुसयेस सत्त्वहरणेच्या वेळी आपली ओळख पटू नये म्हणून भगवान शिव आपल्या वाहनाशिवाय येथे आले त्याची खूण म्हणून येथील महादेव मंदिरासमोर नंदी नाही. या संस्थानाचा दत्त जयंती उत्सव सहा दिवसांचा असतो. प्रतीवर्षी मार्गशिर्ष शुद्ध 14 रोजी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी संपन्न होतो. दुसऱ्या दिवशी भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. छबीना, पाच सोंग, तीर्थप्रसाद हे कार्यक्रम होतात. महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गावात भिक्षाही मागितली जाते. भिक्षान्न गृहण केले जाते. [][]

याच स्थानावर दत्तभक्त दासोपंतांना प्रत्यक्ष दत्तदर्शन झाले. त्यांना स्वतःच्या चरण पादुका दत्तमहाराजांनी दिल्या तेच हे पवित्र स्थान असल्याचा उल्लेख आहे. येथील मंदिरातील वरद दत्तमूर्ती एकमुखी असून, अतिशय दुर्मिळ आहे. ही मूर्ती वालुकामय, षड्भुजा आहे. मूर्ती अत्यंत खोल गाभाऱ्यात असून हे भारतातील असे एकमेव स्थान आहे, ज्या ठिकाणी 'दत्त यंत्र' आहे. राक्षसभूवन या गावामधे गोदावरी नदीपात्रात सती समाधि आजही बघन्यास मिलते.

राष्ट्रीय महामार्ग २११ पासून हे स्थान फक्त ११ किलोमीटर अंतरावर आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "बीड". १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा].
  2. ^ "HISTORY – MARATHA PERIOD". Nasik District Gazetteer. 4 September 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "राक्षसभुवनच्या वरद संस्थानात सहादिवसीय दत्त जन्म सोहळा !".[permanent dead link]
  4. ^ "दत्तात्रेयांचे आद्यपीठ वरद दत्त संस्थान".[permanent dead link]