Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

{{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = रघुनाथराव बाजीरा | पदवी = | चित्र = Ragonath Row Ballajee.jpg | चित्र_शीर्षक = ब्रिटिश चित्रकार जेम्स फोर्ब्स याने रेखलेले रघुनाथरावाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८१३) | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक = | राज्य_काळ = | राज्यारोहण = | राज्याभिषेक = | राज्यव्याप्ती = | राजधानी = | पूर्ण_नाव = रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे) | इतर_पदव्या = | जन्म_दिनांक = [[ ऑगस्ट१८, इ.स.1734 | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = इ.स. १७८२ | मृत्यू_स्थान = | पूर्वाधिकारी = माधवराव | राजपद_वारस = | राजपद_वारस_प्रकार = | उत्तराधिकारी = सवाई माधवराव | वडील = बाजीराव बल्लाळ | आई = काशीबाई | पत्नी = आनंदीबाई | इतर_पत्नी = | पती = | इतर_पती = | संतती = अमृतराव, बाजीराव (दुसरा) | राजवंश = | राजगीत = | राजब्रीदवाक्य = | राजचलन = | तळटिपा = }} रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (डिसेंबर १६, इ.स. १७२१ - इ.स. १७८२) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.

पेशवाईसाठी प्रयत्नसंपादन करा

नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्‍याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.