अटक (उर्दू: اٹک) तथा कॅम्पबेलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहर आहे. १९०१मध्ये २,८६६ लोकसंख्या असलेल्या अटकची लोकसंख्या १९९८मध्ये सुमारे १,००,००० होती.

पाकिस्तानी वायुसेनेचा कामरा वायुसेना तळ येथून जवळ आहे.

सिंधु नदीकाठी असलेल्या या शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. मोगल सम्राट अकबर याने खवाजा शमसुद्दीन खवाफी याला येथे किल्ला बांधण्याचे फर्मावल्यावर १५८३मध्ये येथील किल्ला बांधून पूर्ण झाला. रघुनाथराव पेशवे आणि तुकोजी होळकर यांनी २८ एप्रिल, १७५८ रोजी हा किल्ला काबीज केला. मराठा साम्राज्याची उत्तरेकडील ही सर्वदूरची सीमा समजली जाते. इंग्रजांनी हा किल्ला १८४९मध्ये घेतला व शहराचे नाव बदलून कॅम्पबेलपूर ठेवले. १९७८मध्ये पाकिस्तान सरकारने ते बदलून परत अटक असे केले.