१७५७ची दिल्लीची लढाई ११ ऑगस्ट, १७५७ रोजी मराठा साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतींमध्ये लढले गेले. मराठा सैन्याचे नेतृत्त्व रघुनाथराव पेशवे तर दिल्ली सल्तनतीच्या सैन्याचे नेतृत्त्व नजीब-उद-दौला रोहिला यांच्याकडे होते.

यात मराठ्यांचा विजय होउन त्यांनी दिल्ली शहर काबीज केले.

याच्या दोनच महिने आधी जून १७५७मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने पलाशीच्या लढाईमध्ये बंगालच्या नवाब सिराज-उद-दौलाचा पराभव करून भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला होता.