इंग्लंड
इंग्लंड युनायटेड किंग्डमचा एक घटकदेश आहे. युनायटेड किंग्डमची ८३% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो. इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इतर सर्व बाजूंनी उत्तर समुद्र, आयरिश समुद्र, केल्टिक समुद्र, ब्रिस्टल खाडी व इंग्लिश खाडी यांनी इंग्लंडला वेढले आहे. इंग्लंडची राजधानी असलेले लंडन ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठे महानगर असून अनेक मानकांनुसार युरोपीय संघातील सर्वात मोठे नागरी क्षेत्र आहे.
इंग्लंड England | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Dieu et mon droit (फ्रेंच) "देव आणि माझा अधिकार" | |||||
इंग्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | लंडन | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
- राष्ट्रप्रमुख | युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स | ||||
- पंतप्रधान | कियर स्टार्मर | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,३०,३९५ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ५,०७,६२,९०० (२००६, अंदाज) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३८८.७/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १९ खर्व अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३८,००० अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | URO | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरजाल प्रत्यय | .uk | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +४४ | ||||
इंग्लंडचे इ.स. ९२७ मध्ये एकत्रीकरण झाले त्या काळापासून आजवर इंग्लंड हा एकच असा देश आहे ज्याच्या सार्वभौमत्वाला कधीही तडे गेले नाहीत. इंग्लंड या देशाने आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य केले, वसाहती स्थापन केल्या. या वसाहती विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्लंडच्या ताब्यात होत्या. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केले त्या त्या भागावर त्यांनी कधीही न पुसता येणारा ठसा उमटवला. आज जगातील बहुतेक देशांमधील कायदे, लष्करी रचना, शिक्षण पद्धति, शास्त्रीय पद्धति, संसदीय लोकशाही व सरकार रचना यांत आजही इंग्रजी पद्धतिीचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. इंग्रजांनी त्यांची इंग्लिश भाषा भाषा जगभरात नेल्यामुळे आज इंग्रजी ही अघोषितरित्या जगाची प्रमुख भाषा आहे
नावाची व्युत्पत्ती
संपादनइंग्लंड या नावाचा अर्थ लॅंड ऑफ ॲंजेल्स. देवदूतांची भूमी असा होतो. इतिहासकारांच्या मते ॲंजेल्स नावाची उत्तर जर्मनी व डेन्मार्क मधील टोळी साधारणपणे ५व्या ते ६व्या शतकात या भागात वास्तव्य करू लागली व या टोळीपासून याचे नाव इंग्लंड असे पडले.
इतिहास
संपादनप्राचीन इतिहास
संपादनअतिशय विस्तृत व नोंदींनी परिपूर्ण असा इंग्लंडचा इतिहास आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाच्या अभ्यासाची प्रथा इंग्रजांनी सुरू केली. संपूर्ण जगाचा इतिहास मांडणाऱ्या इंग्रजांनी इंग्लंडच्या इतिहास अतिशय सखोलरीत्या अभ्यासून नोंदवला आहे. इंग्लंडचा मानवी इतिहास जुना असून पाषाणयुगातील स्टोनहेंज याची साक्ष देतात. ब्रिटिश बेटे मुख्य युरोपापासून हिमयुगानंतर तुटली त्यामुळे इंग्लंडमध्ये युरोपमधील मानवी वस्ती सर्वात शेवटी झाल्याचे मानण्यात येते. साधारणपणे इ.स.पू.११,००० वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये मानवाची वसती झाल्याचे मानण्यात येते. रोमन साम्राज्याने इंग्लंडच्या भूमीवर आक्रमण करून त्याला रोमन साम्राज्याचा भाग बनवला.
मध्ययुगीन
संपादनरोमन साम्राज्याच्या पतनानंतर इंग्लंडमध्ये ब्रिटिश बेटांच्या दक्षिण भागात वास्तव्यास असलेल्या ॲंग्लो सॅक्सनी टोळ्यांची राज्ये चालू झाली. साधारणपणे ५ शतकापासून अनेक लहान मोठी ॲंग्लो सॅक्सन राज्ये अस्तित्त्वात होती. या काळातील आर्थर राजाच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. इंग्लंडचे युरोपबरोबरच ख्रिस्तीकरण झाले. इ.स. ५०० मध्ये इंग्लंडमध्ये केंट,इसेक्स, ससेक्स इत्यादी ७ लहान राज्ये अस्तित्त्वात होती. या राज्यांची एकमेकात भांडणे होत व एकमेकांवर चढाओढी चालत. १० व्या शतकात वेसेक्स राज्याने संपूर्ण इंग्लंडवर नियंत्रण मिळवले व एका सार्वभौम इंग्लंडची स्थापना इ.स. ९२७ मध्ये झाली. इ.स. १०१६ मध्ये डेन्मार्कचा राजा कनुटे याने इंग्लंडवर कब्जा मिळवला व थोड्या काळाकरिता तो इंग्लंडचा राज्याधिकारी बनला.
१० व्या शतकात इंग्लंड हा तत्कालीन देश युरोपमधील इतर देशांपेक्षा आर्थिकदृष्ट्या बराच मागसलेला होता. साधनसामुग्रीची तसेच सुपीक प्रदेशाची कमतरता हे मागासण्याचे कारण होते. शेजारील फ्रान्स हा त्यामानाने खूपच सधन देश होता. इंग्लंडने या काळातच आक्रमक साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. फ्रान्स बरोबरील अनेक युद्धात साधन सामुग्रीची कमतरता असूनही अनेक युद्धात फ्रान्सचा पाडाव केला व फ्रान्समधील बराच भाग व्यापला. याला इंग्लंड फ्रान्स शतकी युद्ध असे म्हणतात. रिचर्डच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने क्रुसेडमध्ये(धर्मयुद्धात) हिरीरीने सहभाग घेतला. क्रुसेडमध्ये वापरलेला ध्वज इंग्लंडचा अधिकृत ध्वज बनला. याच काळात इंग्लंड एक प्रबळ लष्करी देश म्हणून उदयास आला. अल्फ्रेडने इंग्लंडच्या भविष्यातील अत्यंत प्रबळ नौदलाची पायाभरणी केली. मध्ययुगात इंग्लंडचे तिरंदाज (Longbows) व नाईट्स (Knights)(सरदार) यांची संपूर्ण युरोपभर प्रबळ योद्धे म्हणून ख्याती होती.
अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली व अनेक घराण्यांनी इंग्लंडचे राजेपद भूषविले. मध्ययुगाच्या अंताला संपूर्ण युरोपबरोबरच इंग्लंडलाही प्लेगचा तडाखा बसला. १५ व्या शतकातील प्लेगच्या साथीत २/३ नागरिक बळी पडले.
ब्रिटिश साम्राज्य व वसाहतवाद
संपादनमध्ययुगाच्या अंतानंतर युरोपमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. रिनैसॉंच्या क्रांतिकारक बदलांनंतर युरोपची विचारसरणी बदलू लागली. शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस लागला. पोर्तुगाल, स्पेन यांच्याकडून नवे देश, नव्या मार्गांचा शोध लागला. इंग्लंडही या बदलांमध्ये मागे नव्हते. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात इंग्लंडने प्रोस्टेस्टंट पंथाचा स्वीकार केला. तिच्याच काळात इंग्लंडमधील धार्मिक दृष्टिकोन व राजकीय दृष्टिकोन हे वेगळे झाले. चर्च ऑफ इंग्लंड हे इंग्लंडमधील धार्मिक घडामोडींचे केंद्र बनले. याचाच परिणाम म्हणून इंग्लंडने या काळात झपाट्याने प्रगती करण्यास सुरुवात केली. अमेरिका खंडाच्या शोधानंतर त्यावर मक्तेदारी मिळवण्यात व भारताच्या मार्गावर नियंत्रण मिळवण्यात इंग्लंड क्रियाशील झाला.
औद्योगिक क्रांती
संपादनपहिले व दुसरे महायुद्ध
संपादन१९१४ ते १९१८ या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. युरोप खंडातील महत्त्वाचे देश यात सामील होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोप या काळात फार महत्त्व होते. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रे--- मित्र राष्ट्रे- बिटिन , फ्रान्स , रशिया ,इटली , अमेरिका....होती.
दुसरे महायुद्ध ते आजवर
संपादनभूगोल
संपादनहवामान
संपादनमोठी शहरे
इंग्लंडमध्ये लंडन हे सर्वात मोठे शहर आहे.
अर्थतंत्र
संपादनक्रीडा
संपादनइंग्लंड हे जगातील बहुतेक सर्वच अतिलोकप्रिय खेळांची जन्मभूमी किंवा माहेरघर आहे. आधुनिक फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, रग्बी, हॉकी या सर्वांची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. यांचे सर्वांचे आधुनिकीकरण, नियमावली तयार करण्याचे श्रेय इंग्रजांना जाते. इंग्लंडमध्ये खेळ हा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय असून इंग्रज लोक हरेकप्रकारच्या खेळात रुची दाखवतात. सामन्यांना हजर रहाणे हा जणू येथील संस्कृतीचा एक अविभाज्य अंग बनला आहे. प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या खेळाला आपली बांधिलकी दर्शवतो व आपण फलाण्या फलाण्या क्लबचे सदस्य आहोत अथवा समर्थक आहोत असे जाज्वल्य अभिमानाने सांगण्याची येथे प्रथा आहे. क्लबस्तरावरील खेळ इतके प्रसिद्ध आहेत की कधी कधी येथील जनता राष्ट्रीय संघाचच्या कामगगिरीची दखल घेत नाही. वृतपत्रांमधील मोठा भाग क्रीडासंबधित बातम्यांसाठी राखीव असतो. प्रत्येक सामन्याचे वर्णन, सामन्या अगोदरच्या-नंतरच्या घडामोडी इंग्रज अतिशय चोखंदळपणे वाचतात.
क्रिकेट
संपादनइंग्लंडमधेच क्रिकेट या खेळाचा शोध लागला.पुर्वीच्या ब्रिटिश राजघराण्यांत हा एक प्रतिष्ठेचा खेळ मानला जाई. या खेळाचा शोध नेमका कधी लागला याची कुठेही नोंद आढळत नाही
फुटबॉल
संपादनफुटबॉल या खेळाच्या शोध हा आजही एक वादाचा विषय आहे. चीन, मेक्सिको, ग्रीस मधील प्राचीन शिल्पांवरून फुटबॉलचे अस्तित्त्व इंग्लंडच्या जन्माअगोदर होते हे सिद्ध होते. त्यामुळे मूळ फुटबॉलच्या शोधाचे श्रेय इंग्लंडकडे येत नाही. परंतु आजच्या आधुनिक फुटबॉलचे जन्मस्थान इंग्लंड आहे यात दुमत नाही. १६ व्या १७ व्या शतकातील फुटबॉल या विषयावरील चित्रे या खेळाची तत्कालीन लोकप्रियता दर्शावतात. कुलीन लोकांसाठी क्रिकेट, कामगार, गरिबांचा खेळ म्हणजे फुटबॉल अशी सामाजिक दरी अस्तित्त्वात होती. ब्रिटिश साम्राज्यात फुटबॉल सर्व वसाहतींमध्ये पोहोचला. इ.स. १८५०च्या सुमारास फुटबॉलचे आधुनिकीकरण चालू झाले. रस्त्यांवर, कामगारवस्त्यांमध्ये रानटीपणे खेळला जाणारा हा खेळ मोकळ्या मैदानांवर खेळला जाऊ लागला, हळूहळू नियम घडत गेले व यांचेच कालांतराने फुटबॉल क्लबमध्ये रूपांतर झाले व त्यातील काही आज जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब म्हणून मिरवत आहेत. साधारणपणे याचवेळेस १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमधील इतर देशात इंग्रज फुटबॉलवेड्यांनी फुटबॉल खेळ पोहोचवला व पहाता पहाता हा खेळ जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय खेळ बनला.[१]
इंग्लंडमध्येही फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. लोकप्रियतेचे जाळे हजारो लहान मोठ्या फुटबॉलक्लबंनी विणले आहे. फुटबॉल असोसिएशन ही मध्यवर्ती संस्था इंग्लिश फुटबॉलचे नियंत्रण करते. इंग्लंडमधील इंग्लिश प्रीमियर लीग ही आजच्या घडीची, जागतिक स्तरावर तुलना केल्यास सर्वाधिक लोकप्रिय लीग आहे. याचे चाहते केवळ इंग्लंडमध्येच नाहीतर जगातील बहुतांशी सर्वच देशांत आहेत. इंग्लिश लीग ही तीन ते चार स्तरांमध्ये खेळली जाते. प्रीमियर लीग, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग प्रत्येक स्तरामध्ये २० किंवा अधिक क्लब एकमेकांशी होम व अवे पद्धतीने साखळी सामने खेळतात. यात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ वर्गस्तरावर विजयी घोषीत होतो व पहिले तीन संघ वरील वर्गात खेळण्यास पात्र ठरतात. तसेच शेवटचे तीन संघांची खालच्या वर्गात रवानगी होते. प्रीमियर लीग मधील विजेता व उपविजेता चॅपियन्स लीगमध्ये खेळतात. याचबरोबर, हे क्लब एफ.ए. कप, शेफील्ड शील्ड अशा अनेक सामन्यांमधील विजेतेपदांसाठी खेळतात. इंग्लंडमधील क्लब हे जगातील सर्वाधिक श्रीमंत मानले जातात. मॅचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, आर्सेनल, चेलसी हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्लबांमध्ये गणले जातात, तसेच प्रीमियर लीगमधील यांचा यशाचा आलेख उल्लेखनीय आहे. लिव्हरपूल हा इंग्लंडच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी क्लब आहे. त्याखालोखाल मॅचेस्टर युनायटेड, आर्सेनल व एव्हरटन यांचा क्रमांक लागतो. इंग्लंडचे क्लब हे केवळ इंग्लंड मध्येच यशस्वी नाहीत तर युरोपीयन व जागतिक स्तरावर देखील यशस्वी आहेत. मॅचेस्टर, लिव्हरपूल, नॉटिंगहॅम या सारख्या क्ल्बनी युरोपीय विजेतेपदे मिळवली आहेत.
इंग्लंडचा राष्ट्रीय संघ हा जगातील सर्वातिक हाईप असणारा संघ मानला जातो. १९६६ मध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. त्या काळातील बॉब चार्लटन यांच्या नेतृत्वाखाली पश्विम जर्मनीला ४-२ असे नमवून इंग्लंडने विश्वकरंडक जिंकला. परंतु यानंतर इंग्लंडला कुठल्याही महत्त्वाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले आहे. त्यानंतर सर्वोत्तम कामगीरी, इ.स. १९९०च्या विश्वकरंडकात उपांत्याफेरी गाठली होती. यानंतर इंग्लंडचा यशाचा आलेख चढ उताराचा राहिला आहे. इ.स. २००८ मध्ये युरो करंडकासाठी पात्रही झाला नाही.
इंग्लंडच्या अनेक महान फुटबॉलपटूंनी इंग्लंडच्या फुटबॉलला एक वेगळी उंची गाठून दिली. बॉबी चार्लटन, गॅरी लिनेकर, डेव्हिड बेकहॅम,रॉजर हंट हे इंग्लंडचे काही नावाजलेले खेळाडू आहेत. सध्याची इंग्लंड संघाची कमान जॉन टेरी फ्रँक लॅम्पार्ड यांसारख्या खेळाडूंकडे आहे.
इतर खेळ
संपादनसमाज
संपादनसाहित्य
संपादनकला
संपादनतत्त्वज्ञान
संपादनसंस्कृती
संपादनपर्यटन
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Sport in England". 20 जुलै, 2008 – Wikipedia द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
औद्योगिक क्रांतीचा आरंभ इंग्लंडमध्ये झाल्यामुळे इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर देखील म्हणतात ......