इ.स. १९९६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ. स. १९९६ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ - १९९८ - १९९९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी-जून
संपादन- जानेवारी १६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.
- फेब्रुवारी ६ - टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार.
- फेब्रुवारी १७ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
- फेब्रुवारी १० - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.
- डिसेंबर १३ - कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
- मार्च २ - जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल १८ - लेबेनॉनच्या कानामधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतींवर इस्रायेलचा हल्ला. १०२ नागरिक ठार.
- एप्रिल २८ - ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया बेटावर मार्टिन ब्रायन्टने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
- मे ४ - होजे मारिया अझनार स्पेनच्या पंतप्रधानपदी.
- मे १० - एव्हरेस्टवर हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार.
- मे ११ - व्हॅल्युजेट फ्लाइट ५९२ हे डी.सी.९ प्रकारचे विमान फ्लोरिडातील मायामी जवळ कोसळले. ११० ठार.
- मे १६ - भारताच्या पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी
- मे २८ - भारताचा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी याचा राजीनामा
- जून १ - एच.डी.देवेगौडा भारताच्या पंतप्रधानपदी.
- जून १२ - भारताचा पंतप्रधान एच.डी.देवेगौडा याच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
जुलै-डिसेंबर
संपादन- जुलै १७ - ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स फ्लाइट ८०० हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कजवळ समुद्रात कोसळले. २३० ठार.
- जुलै १८ - कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
- जुलै २० - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.
- जुलै २७ - अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
- ऑगस्ट १ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
- डिसेंबर ३० - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
जन्म
संपादन- १४ फेब्रुवारी - अबु हैदर, बांग्लादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १८ ऑक्टोबर - विक्रम फलटणकर , मराठी लेखक
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ९ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
- मे ३ - वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार.
- मे ५ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
- जून १७ - मधुकर दत्तात्रेय देवरस उपाख्य बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
- जुलै २४ - मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.
- सप्टेंबर २६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार.
- सप्टेंबर २७ - नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ५ - सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- ऑक्टोबर ३० - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.