कोफी अन्नान ( ८ एप्रिल १९३८ - मृत्यू: १८ ऑगस्ट २०१८) हे घाना देशामधील एक मुत्सद्दी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आहेत. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले अन्नान हे सातवे सरचिटणीस होते. जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल २००१ सालचे नोबेल शांतता पारितोषिक अन्नान व संयुक्त राष्ट्रे ह्यांना विभागून दिले गेले होते. अन्नाननी आपल्या कारकिर्दीमध्ये एड्स रोगाचा आफ्रिका खंडावरील वाढता विळखा थांबवण्यासाठी परिश्रम केले होते तसेच मानवी हक्क जपण्यावर त्यांनी प्राधान्य दिले. २००३ सालच्या अमेरिकायुनायटेड किंग्डम ह्यांनी केलेल्या इराकवरील हल्ल्याला अन्नान ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.

कोफी अन्नान
Kofi Annan 2012 (cropped).jpg

कार्यकाळ
१ जानेवारी १९९७ – ३१ डिसेंबर २००६
मागील बुट्रोस बुट्रोस-घाली
पुढील बान की-मून

जन्म ८ एप्रिल, १९३८ (1938-04-08) (वय: ८४)
कुमासी, गोल्ड कोस्ट (आजचा घाना)
मृत्यू १८/०८/२०१८
राष्ट्रीयत्व घाना
गुरुकुल मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
धर्म प्रोटेस्टंट
सही कोफी अन्नानयांची सही

२००३ साली भारत सरकारने अन्नानना इंदिरा गांधी पुरस्कार देऊन गौरवले. भारत सरकार व घाना सरकारांनी एकत्रितपणे आक्रा येथे घाना-इंडिया कोफी अन्नान सेंटर ऑफ एक्सलन्स इन आय.सी.टी. ह्या माहिती तंत्रज्ञानामधील उच्च शिक्षण संस्थेची स्थापना केली.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: