सप्टेंबर १३
दिनांक
(१३ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५६ वा किंवा लीप वर्षात २५७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
दुसरे शतकसंपादन करा
- १२२ - हेड्रियनच्या भिंतीचे बांधकाम सुरू.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८१४ - १८१२चे युद्ध - ब्रिटिश सैन्याला बाल्टिमोर, मेरीलँड जिंकण्यात अपयश. येथून अमेरिकन सैन्याची सरशी होत गेली.
- १८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटने मेक्सिको सिटी जिंकले.
- १८९९ - अमेरिकेतील सर्वप्रथम जीवघेण्या अपघातात हेन्री ब्लिस मृत्युमुखी.
विसावे शतकसंपादन करा
- १९०० - पुलांग लुपाची लढाई.
- १९२३ - मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनच्या सर्वेसर्वापदी.
- १९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
- १९४३ - च्यांग कै-शेक तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७१ - न्यू यॉर्कच्या ऍटिका तुरुंगात कैद्यांची दंगल थोपवण्यासाठी पोलिस व नॅशनल गार्डला पाचारण. कारवाईत ४२ ठार.
- १९९९ - मॉस्कोमध्ये दहशतवाद्यांचे बॉम्बस्फोट. ११९ ठार.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
- २००६ - माँत्रियालच्या डॉसन कॉलेजमध्ये किमवीर गिलने एक विद्यार्थ्याला मारले, १९ जखमी केले व नंतर आत्महत्या केली.
जन्मसंपादन करा
- १०८७ - जॉन दुसरा कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
- १८५१ - वॉल्टर रीड, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
- १८५७ - मिल्टन हर्शी, अमेरिकन उद्योगपती.
- १८६० - जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
- १८६४ - रॉबर्ट कटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - पर्सी ट्वेंटीमन-जोन्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - रमोन ग्राउ, क्युबाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०२ - आर्थर मिचेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबिन स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - मायकेल जॉन्सन, अमेरिकन धावपटू.
- १९६८ - चंडिका हथुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - गोरान इव्हानिसेविच, क्रोएशियाचा टेनिस खेळाडू.
- १९७६ - क्रेग मॅकमिलन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- ८१ - टायटस, रोमन सम्राट.
- १४३८ - दुआर्ते, पोर्तुगालचा राजा.
- १५९८ - फिलिप दुसरा, स्पेनचा राजा.
- १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
- १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ११ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर महिना