रायबा
स्वागत | रायबा, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | रायबा, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७३४ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
विकिस्त्रोत
संपादनरायबा, विकिस्त्रोत हा एक असा प्रकल्प आहे जेथे आपण प्रताधिकारमुक्त जुने साहित्य संकलित करू शकतो. भारतीय कायद्यानुसार ६० वर्षापुर्वी (म्हणजे १९५२ पुर्वी) मृत्यू पावलेल्या लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त आहे. असे साहित्य दुर्मिळ आहे, त्यामुळे अशी एकही प्रत आपल्याकडे असेल तर आपण ती विकिस्त्रोतावर टाकून ती सर्वांस उपलब्ध करून देऊ शकतो. मी सध्या विकिस्त्रोतावर महात्मा फुले यांच्या साहित्यावर काम करत आहे, आपणांस ते इथे पाहता येईल [१] . समस्त लेखकांची यादी इथे उपलब्ध आहे [२]. या यादीमध्ये १९५२ पुर्वी मृत्यु झालेल्या लेखकांची नावे जोडू शकता. आपणाकडे एखादे असे पुस्तक असेल तर ते आपण स्वतः टाईप करू शकता, किंवा स्कॅन करून [३] येथे चढवू शकता म्हणजे इतरांच्या मदतीने ते संपुर्ण टाईप करता येईल. आपणांस संपुर्ण पुस्तक एका बैठकीत टाईप करण्याची गरज नाही, एका दिवशी एक पान केले तरी खूप! कळवावे! गणेश धामोडकर (चर्चा) १६:३१, २ जानेवारी २०१२ (UTC)
:)
संपादनधन्यवाद रायबा! :)
सहकार्याच्या अपेक्षेत
संपादननमस्कार रायबा, आपण मराठी विकिपिडीयावर देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. एक नम्र विनंती करावीशी वाटते कि जर आपण काही काळ विवाद टाळण्याचा प्रयत्न केला तर मराठी विकिपिडीयावरील वातावरणाचा समतोल राखण्याच्या कामी प्रचालक मंडळास बहुमुल्य सहकार्य होईल. आपण काम करीत असतांना आपण आपल्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. तेव्हा आपल्या कडून हि अपेक्षा करण्या मला हरकत नसावी. सहकार्याच्या अपेक्षेत -- राहुल देशमुख ०३:००, २८ जानेवारी २०१२ (UTC)
नमस्कार रायबा, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल - समज गैरसमज
संपादननमस्कार रायबा,
सर्व प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आपण आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे आणि दाखविलेल्या सजगतेचे कौतुक आहेच त्याच संदर्भात आपले "चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल " वाचले आणि काही गोष्टींबद्दल कदाचित आपले झालेले गैरसमज दूर व्हावे या साठी हा लेखप्रपंच आहे. यात कोणालाही दुखावायचा किंवा "आरे ला कारे" करणे हा उद्देश नाही. खूप पूर्वी चावडी हे असंख्य विषयावर अतिशय चांगल्या आणि निरोगी चर्चा करण्याचे स्थान होते. नवीन सदस्य हे जसे सहाय्य पानावर जात असत त्याच प्रमाणे चावडी वर जाऊन वेगवेगळ्या सदस्यांची मते जाणून घेऊन त्यात आपले विचार मांडत असत. त्यामुळे मराठी विकिपीडिया संदर्भात चांगले मार्गदर्शन होत असे आणि नवीन आणि जुन्या सदस्यांचा उत्तम समन्वय त्यात साधला जात असे. आपल्या पैकी अनेक प्रचालक आजही त्याकाळी झालेल्या चर्चेचे दाखले मराठी विकिपीडियाच्या विकी शिकवणी मध्ये देतात. वेळ काढून वाचा गुगल सादरीकरण मराठीतून किंबहुना सध्याची कार्यरत असेलेली अनेक सदस्यांची जडण घडण ही यातूनच झाली आहे.
पण कालांतराने चावडी हे सदस्यांच्या वयाचा, मानाचा, अनुभवाचा कसलाही मुलाहिजा न बाळगता बिनबुडाचे आरोप करणे यासाठी सुरू झाला. व्यक्तिगत आरोप आणि चारित्र्यहनन करण्याकरीता विकिपीडिया चर्चा पानांचा उपयोग होवू लागला. तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आय पी हा लेख पहा वापरुन स्वत:चे गुप्त ठेवून इतर सदस्यांना नामोहरम करणे असे प्रकार सुरू झाले. अनेक प्रचालकांना तर अशी शंका आहे की काही नियमित सदस्यांनी स्वतःचे Duplicate ID बनवून व्यक्तिगत आरोप आणि चारित्र्यहनन करायचा प्रयत्न केला आहे. याचसाठी इतर उपपानाबरोबर विकिपीडिया:चावडी/वादनिवारण हे उपपान प्रचालकांनी करून त्यात असे लिखाण नेण्यास सुरुवात केली. याचा एकमेव उद्देश नवीन सदस्यांचे मराठी विकिपीडिया बद्दल चे मत पहिल्याच दिवशी वाईट किंवा पूर्वग्रहदूषित होवू नये हाच आहे. त्याच प्रमाणे चावडी मुख्य पान अशा मंडळी पासून वाचवण्यासाठी सुरक्षित करण्याचा निर्णय प्रचालकांनी घेतला होता. मध्यवर्ती पानावर जाऊन तेथे चावडी वर सर्व जण चर्चा करू शकतातच. यात प्रचालकांच्या सोईनुसार विषय थंड्या बस्त्यात हलवणे असा मुळीच नाही.
कृपया एक खूणगाठ मनात अवश्य असू द्यावी की प्रचालक मराठी विकिपीडिया वरील कुठलीही कार्यवाही ही एकट्याने न करता अनेकांशी चर्चा करून किंवा विषय नाजूक असल्यास प्रचालक समुदायामध्ये बोलून मगच कार्यवाही करीत असतात. प्रचालक मंडळी ही नवीन सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी कायम झटत असतात. आपण या संदर्भात अनेक प्रचालकांनी मिळून बनवलेली सहाय्य पाने विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन आणि त्यातील असंख्य दुवे पाहिले असतीलच. मराठी विकिपीडिया वर चांगले काम व्हावे आणि व्यक्तिगत आरोप आणि चारीत्र्यहनन होवू नये यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.
आता राहिला प्रश्न प्रचालकांच्या अधिकार आणि कर्तव्ये. तर या बाबतीत इंग्रजी विकिपीडियावरून घेतलेल्या सर्व गोष्टी आणि नियम येथे लागू होतात. आजही मला अनामिक IP वरुन प्रचालक पदासाठी धमकी वजा संदेश आले आहेत. वैयक्तिक मला मुळात "प्रचालक" पदाचे कधीच आकर्षण नव्हते आणि नाही. माझ्या मराठी विकिपीडिया वरील कामासाठी (किंबहुना अधिक काम करण्यासाठी) ते मला देण्यात आले होते. त्यामुळे ते पद गेले तरी मला काहीच निराशा येण्याचे किंवा वाईट वाटायचे कारण नाही.
मला आशा आहे आपणच नव्हे तर हे वाचणारे असंख्य सदस्य याचा Positively विचार करून मराठी विकिपीडिया वर व्यक्तिगत आरोप न करता अधिकाधिक चांगले लिखाण आणि चांगले काम करतील अशी मला आशा आहे..... मंदार कुलकर्णी (चर्चा) ०१:१४, २४ मार्च २०१२ (IST)
वर्ग:पुणे निवासी
संपादनपुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . ०८:५७, २५ मार्च २०१२ (IST)
मत नोंदवले आहे.
संपादननमस्कार रायबा. आपल्या कौलावर मी मत नोंदवले आहे. या वादात येण्याची इच्छा अशी नव्हती. पण तुम्ही बोलावल्याने मत नोंदवले आहे. मला यातील अनेक घटनांचा इतिहास माहिती नाही. शिवाय प्रचालकांचे मौन का असावे हे ही समजत नाही. पण तरीही मला एक मत मांड्डायचे आहे ते म्हणजे मी कोणत्याही 'बाजू'चा नाही. मी प्रचालक नाही. मी एक सामान्य सदस्य आहे पण य्थे काम करायला मला आवडत होते कारण येथे वाद नव्हते. सध्या परिस्थिती तशी दिसत नाही. अर्थातच माझा कामातला रस कमी झाला आहे. सदस्य आणि प्रचालक यात सुसंवाद स्थापन करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे. त्यासाठी प्रचालकांनी पुढाकार घेतला पाहिजे कारण त्यांच्याकडे जास्त अधिकार आहेत (असे मला भासते). अन्यथा मनमानीचा उबग येणे मला साहजिक वाटते. याच वेळी अनेक जुने सदस्य जसे की नर्सीकर येथून दिसेनासे झाले आहेत हे ही जाणवते आहे. पण कदाचित त्याची काही वेगळी कारणे असू शकतात. असो निनाद ०५:५३, २७ मार्च २०१२ (IST)
/* विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी */
संपादननमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:२२, २७ मार्च २०१२ (IST)
नमस्कार
संपादनरायबा,
आशा करतो तुमच्याकडे सर्व काही खुशाल असेल. अनेक दिवसा/आठवड्यांनी सलग असा वेळ मिळाल्याने येथे चक्कर टाकीत आहे.
पहिले काम म्हणजे तुम्ही आणि दहिवळांनी मांडलेल्या प्रश्न व कौलांबद्दल मी माझे मत लिहेन असे वचन दिले होते ते पूर्ण करणे. तर त्यासाठी मी माझ्या चर्चापानावर सदस्य चर्चा:अभय नातू/विसंवाद कौलप्रस्ताव येथे माझी मते लिहिली आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया कळवावी. माझे लिखाण खरडा असून त्यावर तुमच्याशी अधिक चर्चेतून बदल करता येतील. हे लिखाण (अद्याप तरी) प्रचालक या नात्याने लिहिलेले नियम नाहीत.
आशा आहे तुम्ही त्यावर तुमचे विचार कळवाल.
भीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालक
संपादनमैने मै दुबलो का मसिहा, जातियवाद के खिलाफ आंधी, चर्चा का तुफान , १,६०,००० से ज्यादा योगदान करनेवाला स्ंयमी महापुरूष भीमरावमहावीरजोशीपाटीलजी को प्रचालकपद के चुनाव के लिये नाम दिया है, क्रुप्या वोट दे विकिपीडिया:कौल/प्रचालक#भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा)
उनकी कुच उपल्ब्धिया,
- एक् प्रचालक् डर् के भाग् गया - वा वा वा
- फ्रांस् मे बैठा कोइ या फ्रांस् कि कंपनी मे काम् कर्ने वाल कोइ हुब हु नकल् करन सीख् गय - वव् वा वा
- अभी मने देखा Balajeeजी भी उनकी तरह लिखना सिख गये.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.