रत्‍नागिरी जिल्हा

महाराष्ट्रातील जिल्हा
(रत्नागिरी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख रत्‍नागिरी जिल्ह्याविषयी आहे. रत्‍नागिरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.

रत्‍नागिरी जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१७° ००′ ००″ N, ७३° ३०′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय रत्‍नागिरी
तालुके मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर
क्षेत्रफळ ८,२०८ चौरस किमी (३,१६९ चौ. मैल)
लोकसंख्या १६,९६,७७७ (२००१)
लोकसंख्या घनता २०७ प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ११.३३%
साक्षरता दर ६५.१३%
प्रमुख शहरे रत्‍नागिरी, चिपळूण
लोकसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
विधानसभा मतदारसंघ दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरी, राजापूर
खासदार विनायक राऊत
संकेतस्थळ


हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.

कोकणातील कौलारू घर

भूगोलसंपादन करा

रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमासंपादन करा

रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय नद्यासंपादन करा

काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री,जगबुडी

तालुकेसंपादन करा

रत्‍नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:

 1. गुहागर
 2. खेड
 3. चिपळूण
 4. मंडणगड
 5. दापोली तालुका
 6. रत्‍नागिरी
 7. राजापूर
 8. लांजा
 9. संगमेश्वर

दळणवळणसंपादन करा

रत्‍नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)

मुंबई ते कोचीन (राष्ट्रीय महामार्ग 66)

प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

 1. आंबडवे
 2. गणपतीपुळे
 3. गणेशगुळे
 4. गुहागर
 5. चिपळूण
 6. जयगड
 7. नाणीज
 8. पावस
 9. पूर्णगड
 10. माचाळ
 11. मार्लेश्वर
 12. रत्‍नागिरी (शहर)
 13. शेरीवली
 14. संगमेश्वर
 15. रसाळगड
 16. महिपतगड

रत्‍नागिरी जिह्यातील गड-किल्लेसंपादन करा

१. आंबोळगड

२. गोपाळगड

३. गोविंदगड

४. जंगली जयगड

५. जयगड

६. पालगड

७. पूर्णगड

8. भवानीगड

9. महिपतगड

१0. महीमंडणगड

११. यशवंतगड

१२. रत्‍नदुर्ग

१३. रसाळगड

१४. विजयगड

१५. सुवर्णदुर्ग

शेतीसंपादन करा

रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२ ) रत्नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा व आजूबाजूची निसर्गरुपी डोंगररांग आहे त्याच्यामुळे रत्नागिरी येथे पर्यटक संपूर्ण जगातून येत असतात त्यासाठी येथे येथील निसर्गभूमी डेव्हलपर्स Nisarg Bhumi developers, Ratnagiri www.nisargbhumi.com 9850155823 ही कंपनी पर्यटकांना सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाप्रमाणे पर्यटकक्षेत्र विकसित करीत आहे, कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुका येथे मोठी जमीन घेऊन तेथे पर्यटकांसाठी एक गाव वसविण्याचे योजले आहे यामध्ये शेतीसह `मामाचे गाव'व `नानानानी पार्क' असे कन्सेप्ट घेऊन कंपनी त्याच्यामध्ये गेली दहा वर्षे काम करीत आहे Nisarg bhumi developers, nisargbhumi.com या कंपनीने अर्ध्याएकर 20 गुंठे व एक एकर दोन एकर प्लॉट मध्ये फार्म हाऊस विकसित केले आहेत व ते डेव्हलप करून विक्रीस काढलेले आहेत आणि त्याच्या मधून खरेदीदाराला आयुष्यभर इन्कम सोर्स कायमस्वरूपी करून दिलेला आहे Nisarg Bhumi developers या कंपनीमुळे रत्नागिरी तसेच कोकण भागाचा विकास होणार आहे यावर्षी अधिक माहिती जाणून घेऊ शकता www.nisargbhumi.com वर..

राजकीय संरचनासंपादन करा

लोकसभा मतदारसंघ (१) : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग.

विधानसभा मतदारसंघ (५) : दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरीराजापूर.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तीसंपादन करा

संदर्भसंपादन करा

रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड | दापोली | खेड | चिपळूण | गुहागर | संगमेश्वर | रत्‍नागिरी | लांजा | राजापूर

बाहेरील दुवेसंपादन करा