आंबोळगड
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आंबोळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
आंबोळगड | |
नाव | आंबोळगड |
उंची | {{{उंची}}} |
प्रकार | गिरिदुर्ग भुईकोट किल्ला |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | {{{डोंगररांग}}} |
सध्याची अवस्था | अतिशय जिर्ण |
स्थापना | {{{स्थापना}}} |
भौगोलिक स्थान
संपादनरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. "मुसाकाजी" या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला. इ.स. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठवली गेली.
कसे जाल ?
संपादनरत्नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.
इतिहास
संपादनछायाचित्रे
संपादन-
आंबोळगडावरील शिल्लक राहिलेली एकमेव तोफ
-
आंबोळगडाची जागा सापडल्यावर तेथे असलेले वादाचे जुने झाड
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
संपादनएक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. ना तटबंदी न वाड्याचे अवशेष. आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहीर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. दोन मोठे समुद्र किनारे असल्याने रिसाॅर्ट हाॅटेले आहेत, वाॅटर स्पोर्ट्स सुरू होत आहेत..
गडावरील राहायची व खाण्याची सोय
संपादनगडालगत भरपूर हाॅटेले, रिसाॅर्ट्स आदी निवासाची व रेस्टॉरंटे, घरगुती जेवण आदीची सोय आहे.
संदर्भ
संपादन- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
संपादन