काजू हे एक फळझाड आहे. या फळाला 'विलायती मॅंगो' म्हणून सुद्धा संबोधले जाते.

" | काजू
काजू बी आणि फळ (बोंडू किंवा जांब)
काजू बी आणि फळ (बोंडू किंवा जांब)
" | शास्त्रीय वर्गीकरण

हिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तऱ्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी खूप प्रसिद्ध आहे.

अधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो. काजू हा आवडीने खाला जाणारा पदार्थ आहे .

काजूचे फळ संपादन

काजूच्या फळाला बोंडू अथवा जांबू असे म्हणतात. बोंडूमध्ये फायबर असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते. हे पाचक, उत्तेजक व सारक आहे.स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत म्हणून काजू कडे पहिले जाते.

काजू खाण्याचे फायदे संपादन

  • हृदयरोग होण्याचे जोखीम कमी करतो.
  • मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
  • अशक्तपणा कमी करतो.
  • इम्यून सिस्टमला बूस्ट अप करतो.
  • डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.

काजू बी संपादन

काजूची बी ही फळाच्या बाहेरील भागात असते. या बीवर प्रक्रिया करून ती फोडतात व तिच्यातील गर काढला जातो. काजूगर हा एक सुका मेवा आहे. ओल्या काजूगराची उसळ केली जाते. काजूच्या बिया ‘सुक्या मेव्या’त गणल्या जातात.

काजूचे झाड संपादन

काजूचे झाड मध्यम आकाराचे असते. हिवाळ्यामध्ये त्यला मोहोर यायला सुरुवात होते. फेब्रुवारी ते मे या काळात काजूचे पीक येते.

लागवड संपादन

महाराष्ट्रातील कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

काजू प्रक्रिया उद्योग संपादन

भारतामध्ये केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू व पश्चिम बंगाल ही प्रमुख काजू उत्पादक राज्ये आहेत. देशातील काजूचे सर्वात जास्त उत्पन्न महाराष्ट्र राज्यात होते. येथे सुमारे १.६०हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली आहे. यातून १.७५ लाख टन एवढे काजूचे उत्त्पन्न मिळते. राज्यातील काजूला परदेशात मोठी मागणी आहे. यातून देशाला परकीय चलन मिळते.

गेल्या तीन दशकांत भारतातील काजूचे लागवड क्षेत्र तिपटीने वाढले आहे. साठाव्या दशकांच्या मध्यात २.४ लाख हेक्टर असणारे लागवड क्षेत्र अलीकडे सुमारे सात लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. काजूची लागवड भारताच्या किनारपट्टीच्या आठ राज्यांत परंपरने होते, अलीकडे काजूची लागवड मध्य प्रदेश व उत्तर पूर्वेकडील राज्यांत नव्याने होऊ लागली आहे. कच्च्या काजूबियांचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन सुमारे ८४० किलोग्रॅम आहे व वार्षिक उत्पादन जवळपास चार लाख टन आहे.

भारतात काजूबियांवर प्रक्रिया करणारे छोटे कारखाने आहेत. सध्या त्यांची संख्या १०५० च्या आसपास आहे व त्यापैकी अंदाजे ४५० कारखाने केरळमध्ये आहेत.

महारा्ष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालाच्या फक्त २५ टक्के एवढ्याच काजू-बीवर राज्यांतल्या ३००० केंद्रांत प्रक्रिया होते. तर ७५ टक्के काजू बी इतर प्रांतांत विक्री करून तिथे प्रोसेसिंग केले जाते. काजू प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात पद्धती अशी: झाडावरून पडलेले काजू गोळा कतात, किंवा काजू बिया विकत आणतात. त्या स्वच्छ पाण्यात धुऊन चार दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया ९० ते १०० अंश सें., तापमानात ४५ मिनिटे उकळून घेतात. (बॉयलर वापरून हे करता येते.). बिया तशाच १२ तास सावलीत वाळवतात (यासाठी ड्रायर वापरता येतो.). दुसऱ्या दिवशी बिया (काजू बी कटर) मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून, त्या सुमारे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर, काजूगरांच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्यांचे पॅकिंग करतात.

काजू टिन फिलिग मशीन, टिन पॅकिंग मशीन, कॅश्यू साइझिंग मशीन अशा प्रकारच्या मशिनरीसुद्धा पॅकिंगसाठी उपलब्ध असतात. शक्यतो पाव किलो, अर्धा किलो व एक किलोचे पॅकिंग ठेवणे किफायतशीर असते. काजू गराची प्रतवारी म्हणजेच ग्रेडिंग काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतवारीमध्ये मोठे अखंड चांगले काजू, मध्यम आकाराचे काजूगर, दुभंगलेले काजूगर, तुकडा काजूगर असतात. काजूगराचा आकार, रंग यावर काजूचा दर अवलंबून असतो.

काजूची निर्यात पूर्वी लाकडी खोक्यांत वर्तमानपत्राचे कागदाचे अस्तर लावून होत असे त्यामुळे काजूला कीड लागण्याचा संभव असे. पण आता १८ लिटर क्षमतेच्या पत्र्याच्या डब्यात १० ते ११ किलो काजू भरून, डब्यातील हवा काढून त्याऐवजी कार्बन डाय ऑक्साईड वायू भरून तो डबा हवाबंद केला जातो. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी :

१. ओव्हन/ ड्रायर
(सिंगल फेज क्षमता ३० किलोग्रॅम काजूगर):
यामध्ये ब्लोअर व फॅनचा वापर करून ओव्हनमध्ये गरम हवा सर्वत्र सारखी खेळवली जाते. त्यामुळे काजूगर व्यवस्थित भाजले जातात. काजूव्यतिरिक्त इतर बऱ्याच प्रक्रियांसाठी या ओव्हनचा उपयोग होतो. उदा. बेदाणे, आंबापोळी, फणसपोळी इत्यादी.

२. बाष्पक (बॉयलर) - यामध्ये स्टीमच्या विशिष्ट आकारामुळे स्टीम पाईपमुळे वाफ लवकर तयार होते व तयार झालेली वाफ काजू ठेवलेल्या भांड्यामध्ये सर्वत्र सारखी खेळवली जाते. त्यामुळे सर्व काजू बिया लवकर एकसारखे शिजून होतात. सदर मशीनसाठी इलेक्ट्रिक, लाकूड, केरोसीन, गॅस, काजूचे टरफल यांपैकी कोणतेही इंधन वापरता येऊ शकते.

३. काजू बी कटर मशीन- काजूगर अखंडपणे साधारणत: ९५ टक्के मिळते. हाताचा व पायाचा असा दोन्ही पद्धतीने मशिनरीचा उपयोग बी फोडण्यासाठी होतो. सदर मशीनवर उभे राहून अथवा बसून काजू बी फोडता येऊ शकतात. कुशल कामगार दिवसाला ३५ ते ४० किलो काजू बी फोडू शकतो.

४. स्टीम सेपरेटर- स्टीम सेपरेटर या उपकरणाच्या साहाय्याने वाफ वेगळी होऊन काजूगराचा रंग स्वच्छ, पांढरा होतो.

५. ह्युमिडिटी चेंबर- काजू प्रक्रियेमध्ये अखंड काजूगराचा तुकडा होऊ नये म्हणून ग्रेडिंग व पॅकिंगच्या आधी पाण्याच्या वाफेची मात्रा देण्याचे हे संयंत्र आहे. काजू प्रक्रियेच्या छोट्या उद्योगाचा विचार केला आणि रोज ५० किलो काजू बियांवर प्रक्रिया केली तर, एक किलो काजू बियांपासून २५० ते ३०० काजूगर मिळत असल्याने ५० किलो काजूबियांपासून दररोज १५ किलो काजूगर मिळतो. रु. १९० प्रति किलो दराने २८५० एवढे उत्पन्न मिळते. कामगारांचे वेतन, इतर खर्च असे काही गृहीत धरून वर्षांला अडीच ते तीन लाख निव्वळ नफा होऊ शकतो.

काजूपासून इतर पदार्थ‌‌ संपादन

काजू बोंडापासून रस तयार करता येतो. काजू बी मोठय़ा प्रमाणावर विक्री होते, मात्र काजू बोंडांचा तितकासा वापर होताना दिसत नाही.

काजू हे निर्यातक्षम फळ आहे. काजूच्या जागतिक व्यापारात भारताला अग्रस्थान आहे. भारताचा हिस्सा काजू निर्यातीत ६० टक्के आहे तर ब्राझीलचा हिस्सा ३० टक्के आहे. एकूण निर्यातमूल्याच्या १.५ टक्के परकीय चलन काजू निर्यातीपासून मिळते. भावी काळात काजूची निर्यात वाढविणे आवश्यक आहे.

काजू सरबत बनविण्याची थोडक्यात कृती:- काजू सरबत बनविताना फळांचा रस काढण्याआधी पूर्ण पिकलेली ताजी टणक फळे एक लिटर पाण्यात २० ग्रॅम साधे मीठ घातलेल्या उकळत्या द्रावणात पाच ते १० मिनिटे उकडून घेतात.. त्यामुळे फळातील टॅनिन निघून जाते. उकळलेली फळे तीन वेळा थंड पाण्यात बुडवून गार करून घेतात. थंड झालेली फळे पुसून त्यांचे देठ काढणे, देठ काढलेली (उरलेसुरले टॅनिन काढल्यावर) फळांचा मशीनमध्ये रस काढणे. रस गाळून घेणे, गाळलेला रस ९५ अंश सें.ग्रे.पर्यंत तापवणे वगैरे क्रिया करतात. या गरम रसात १:१३/४ (?) या प्रमाणात साखर मिसळतात. सोडियम बेन्झॉइट, रंग, सुगंध आदी मिसळले की सरबत बनते. सरबताची आम्लता (पी एच व्हॅल्यू) दोन तर त्यातले साखरेचे प्रमाण ६७ टक्के असावे अशी अपेक्षा असते. गार झाल्यावर सरबताचे पॅकिंग करतात..

मद्य संपादन

एक प्रकारचे मादक द्रव्य राहते. छान लागते.