पूर्णगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

पूर्णगड

पूर्णगड
नाव पूर्णगड
उंची फूट
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण
जवळचे गाव रत्नागिरी,पूर्णगड, भाटय़े , पावस
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


चित्र:पूर्णगड किल्यावरून दृश्य.jpg
किल्यावरून दिसणारे दृश्य
रत्‍नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.

मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्‍नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्‍नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे.

  • पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.

गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे..

पाहण्यासारखे

संपादन
  • पूर्णगड किल्ला गावखडी गावाजवळ उभारण्यात आला आहे. या किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मारुती मंदिराची सध्या गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र - सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.

येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरून गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची तटबंदी ढासळली होती परंतु त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे आणि इतर तटबंदी काऴया पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.

  • या गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो.

गडावरील राहायची सोय

संपादन

या किल्ल्यावर राहण्याची सोय उपलब्ध नाही. पूर्णगड हे जवळचे गाव आहे जेथे निवासाची सोय उपलब्ध आहे.

गडावरील खाण्याची सोय

संपादन

या किल्ल्यावर खाण्याची सोय नाही.

गडावरील पाण्याची सोय

संपादन

पूर्णगडावर पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे. लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.

गडावर जाण्याच्या वाटा

संपादन

जलदुर्ग असल्याने पायथ्याच्या गावातून एक सोपी वाट गडावर घेऊन जाते.१०ते १५ मिनिटांच्या चढाई ने किल्ल्यावर जाता येते.

मार्ग

संपादन

Ratnagiri rajapur

जाण्यासाठी लागणारा वेळ

संपादन

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन