चिपळूण हा रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुका आहे. या तालुक्यात १६७ गावे, १ नगरपरिषद व १३० ग्रामपंचायती आहेत. एकूण लोकसंख्या २७९१२२ असून, पुरुष १३४७८८ व स्त्रिया १४४३३४ आहेत.

  ?चिपळूण तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
प्रांत महाराष्ट्र
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
लोकसंख्या २,७९,१२२
भाषा मराठी
तहसील चिपळूण
पंचायत समिती चिपळूण

चिपळूण तालुक्यातील काही गावांची नावे ( Few villages in Chiplun Taluka (Division))

  1. वाघिवरे (Waghivare)
  2. बामणोली (Bamnoli)
  3. बोरगाव (Borgaon)
  4. चिवेली (Chiveli)
  5. वडद (Vadad)

वाघिवरे गाव ( Waghivare Village ) वाघिवरे गाव चिपळूण तालुक्यात येते. वाघिवरे गावात काही वाड्या आहे - 1.मधलीवाडी ( Madhaliwadi, waghivare) 2.कदमवाडी 3.घडशीवाडी 4.रेवाळेवाडी 5.भोईवाडी शिवाय मोहल्ला ही आहे.


श्री चंडिकाई कालकाई काळेश्वरी ( Shree Chandikai Kalkai Kaleshwari ) देवी ही वाघिवरे गावची ग्रामदेवता आहे.


Shree Chandikai Kalkai Temple, Waghivare


पंचक्रोशीतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचे मंदिर जवळच्या जंगलात गावाच्या वेशीवर आहे. अलीकडेच भक्त ग्रामस्थांनी मूळ स्थानीच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

Palkhi bhet (chandikai waghjai)
शिमग्यानिमित्त देवळातून देवीची पालखी गावात येते.यादिवशी शेजारील गाव बामणोलीची देवी वाघिवरे गावच्या देवीची भेट घेण्यासाठी येते. या दोन देवींच्या पालखीची भेट हा एक नयनरम्य सोहळा असतो. या ठिकाणी छोटेखानी जत्राचे ही आयोजन असते.
Shree Hitvardhak Ganesh Temple photo in Maharashtra Times title

मधलीवाडी (Madhaliwadi Waghivare) मध्ये श्री हितवर्धक गणेश मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती निमित्त येथे गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते.


कदमवाडी मध्ये श्री व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. जवळील सभामंडपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो.

घडशीवाडीमध्ये नवरात्रीत देवीची स्थापना करण्यात येते.

कसे जाल - चिपळूण ते वाघिवरे एसटी बस सेवा उपलब्ध आहेत. शिवाय चिपळूण-गुहागर बस ने वाघिवरे(चिवेली) फाट्यावर उतरून रिक्षा करून वाघिवरे गाठता येइल.


[]

हवामान

संपादन

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ http://ratnagiri.nic.in/chiplun/index.html
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.