यूटीसी−०७:००
यूटीसी−०७:०० ही यूटीसीच्या ७ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ उत्तर अमेरिका खंडामधील अमेरिका व कॅनडा देशांमध्ये माउंटन प्रमाणवेळ ह्या नावाने ओळखली जाते. तसेच पॅसिफिक प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून देखील यूटीसी−०७:०० वापरली जाते.
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश १०५ अंश प |
पश्चिम सीमा (सागरी) | ११२.५ अंश प |
पूर्व सीमा (सागरी) | ९७.५ अंश प |