यूटीसी−०४:००
यूटीसी−०४:०० ही यूटीसीच्या ४ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ कॅरिबियनमधील बहुसंख्य देशांची वर्षभर, कॅनडाच्या पूर्वेकडील काही प्रांतांची तसेच दक्षिण गोलार्धामधील ब्राझील, बोलिव्हिया, गयाना ह्या देशांची हिवाळी प्रमाणवेळ आहे. तसेच अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चिले, पेराग्वे इत्यादी देशांमधील अनेक भूभाग यूटीसी-४ ही उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरतात.
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश ६० अंश प |
पश्चिम सीमा (सागरी) | ६७.५ अंश प |
पूर्व सीमा (सागरी) | ५२.५ अंश प |