मकरसंक्रांत

उत्तरायणातील प्रमुख भारतीय सण...
(मकरसंक्रांती या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.[] या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात.[] बायका उखाणे घेतात.[] व एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात.

संक्रांत वाण
तिळाची वडी
सुगड आणि वाणाचे साहित्य त्य

मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते १५ जानेवारीला येते, अन्यथा १४ जानेवारीला असते.

मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात) किंवा सोप्या भाषेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया), आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर).

मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. हा सण रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात - जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे ६० ते १०० दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते.

भौगोलिक संदर्भ

संपादन

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.[] इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा

संपादन

इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०

  • इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
  • इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
  • इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
  • इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
  • सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
    • १३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
    • १५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
    • १४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
  • १६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)
  • १७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)
  • १८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)
  • १९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)
  • २० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)
  • २१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)
  • २२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)
  • २३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)

प्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्त्व

संपादन

महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.[]

समजुती

संपादन

संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते.[] मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही.

संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो.[] या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.[] संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.[]

महाराष्ट्रातील संक्रांत

संपादन
 
मकरसंक्रांती निमित्त महिला वाण देताना

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.

आहारदृष्ट्या महत्त्व

संपादन

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात..[१०] तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

तिळवण व बोरन्हाण

संपादन

नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.[११]

लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.[११] चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात.[१२] अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.

 
बोरन्हाण
 
बोरन्हाण[१३]

प्रादेशिक विविधता

संपादन

संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.[१४]

  • उतर भारतात,
    • हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
    • पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
    • पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहरीदेवीची पूजा करतात.[१५] 
  • पूर्व भारतात,
  • पश्चिम भारतात,
गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठािया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.[१६]
    • गुजरातमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजरातला भेट देतात.[१७]
  • दक्षिण भारतात,
    • कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
    • तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
    • दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.[१८] मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
    • शबरीमला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
  • भारताबाहेरील देशात-
  • नेपाळमध्ये,
    • थारू (Tharu) लोक - माघी
    • अन्य भागात माघ संक्रान्ति (Maghe Sankranti), माघ संक्राति (Maghe Sakrati)
  • थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
  • लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
  • म्यानमार - थिंगयान (Thingyan)

यात्रा

संपादन

मकरसंक्रांतीच्या दिवशी कलकत्ता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.[१९]

  • हिमालयातील देवप्रयाग, मुनी की रेती, कीर्तिनगर, व्यासघाट या ठिकाणी संक्रातीच्या निमित्ताने मेळे भारतात.[२०]
  • या दिवशी केरळमधील शबरीमला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.[२१]

अन्य माहिती

संपादन

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात.

दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.

  • मकर संक्रांती

मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।

तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।

(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी.

मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिनमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिीसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. 'फरगीविह अँड फरगेट' हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो.

महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे.

बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनवेल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात.

हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात.

दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे.

  • किंक्रांत

संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.

संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात.

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो.

पहा : कर्कसंक्रांती

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Kapoor, Subodh (2002). The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 9788177552720.
  2. ^ नेवरेकर, दीपाली (१०. १. २०२०). "Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन कधी आणि कसं कराल?". Marathi Latestly. १३. १. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Makar Sankranti 2020: मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि मुहूर्त". महाराष्ट्र टाईम्स. १३.१. २०२०. 2020-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३.१. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture ikhtn World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
  5. ^ Adgadanand, Swami (1994-07-22). जीवनादर्श एवं आत्मानुभूति: Jeevanadarsh Evam Atmanubhuti (हिंदी भाषेत). Shree Paramhans Swami Adgadanandji Ashram Trust.
  6. ^ Cendavaṇakara, Sadānanda (1966). Bhāratīya saṇa āṇi utsava. Nirṇaya Sāgara Buka Prakāśana.
  7. ^ पोंर्येकर, पूनम (९. १. २०२०). "Bhogi 2020: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी का साजरी केली जाते 'भोगी'? जाणून घ्या या दिवसाचे विशेष महत्त्व". Marathi Latestly. १३. १. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ पोर्येकर, पूनम (१२. १. २०२०). "Bhogi Bhaji Recipes: भोगीच्या भाजीपासून त्याच्या कालवणापर्यंत अशा बनवा या लज्जतदार रेसिपीज, नक्की करुन करा". Marathi Latestly. १३. १. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  10. ^ Bhatt, S. C. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes) (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353562.
  11. ^ a b सरफरे, शलाका (१३. ११. २०१८). "हलव्याचे दागिने ऑनलाइनही लोकप्रिय". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ Sant, Indira Narayan (1997). Ghuṅguravāḷā. Snehavardhana Prakāśana.
  13. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  14. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
  15. ^ Shakti Gupta, Festivals, fairs and fasts in India
  16. ^ LLC, Books (2011-07-07). Gujarati Culture: Culture of Gujarat, Makar Sankranti, Gujarati Cinema, Gujarati People, Navratri, Gujarati Cuisine, Dandiya Raas, Diwali in Gujarat, Bhavai, Garba, Gujarati Comedy Group, List of Garba Events in Vadodara, Music of Gujarat, Sanedo, Murabba (इंग्रजी भाषेत). General Books LLC. ISBN 9781156488751.
  17. ^ Josh, Jagran. Current Affairs January 2016 Hindi eBook: by Jagran Josh (हिंदी भाषेत). Jagran Josh.
  18. ^ Verma, Priyanka (2014-10-27). Pongal: Festival Of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789351654346.
  19. ^ Gangasagar Mela: A Pilgrim's Guide (इंग्रजी भाषेत). Office of the District Magistrate, 24-Parganas, Government of West Bengal : distributor, Firma K.L.M. 1976.
  20. ^ translator., सिंह, भगत, 1907-1931. Works. Selections. सिंह, भगत, 1907-1931. Works. Selections. Hindi. जैन, हरीश, 1951- editor. माथुर, नितिन,. भगत सिंह : जेल नोटबुक : संदर्भ और प्रासंगिकता : संपूर्ण नोटबुक और बहुत सी नई सामग्री के साथ. ISBN 9789352661398. OCLC 1010538438.CS1 maint: extra punctuation (link)
  21. ^ Guides, Rough (2016-10-03). The Rough Guide to India (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 9780241295397.

बाह्य दुवे

संपादन