या लेखात उखाण्यांबद्दल केवळ वैश्वकोशीय स्वरूपाची माहिती लिहावी. संकल्पना समजावण्यापुरती मोजकी उदाहरणे वगळता उखाण्यांचे संकलन या लेखात अपेक्षित नाही. अशा संकलनासाठी विकिक्वोट या विकिपीडियाचा सहप्रकल्प वापरावा.

अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे [ संदर्भ हवा ]. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.

माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारीला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत. उखाणे हे यमकस्नेही, नादमयी असतात. उखाणे हे महाराष्ट्राची,मराठी भाषेची,मराठी मातीची अस्सल खूण आहे. कोडे, कूटप्रश्न वगैरे साठी सुद्धा उखाणा हा शब्द वापरला जातो.संतमंडळीनी गूढ अध्यात्म्याचे विवेचन करण्यासाठी आणि भोवतालावर भाष्य करण्यासाठी उखाण्याचा वापर केलेला आहे. उदाहरणार्थ, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दुध किती. काही वेळा उखाण्याच्या सुरुवातीला प्रश्न असतो आणि उखाण्याच्या शेवटी उत्तर असते.[]

काही खास उखाणे

संपादन
  • रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.
  • मायामय नगरी, प्रेममय संसार,… च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
  • जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
  • माझ्याशी लग्न करायला, ........ झाली राजी, केल मी लग्न, ......... झाली माझी
  • उगवला रवी मावळली रजनी,……चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
  • जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,……सहवासात सापडतो आनंद.
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……बरोबर बांधली जीवनगाठ.
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री



पुस्तके

संपादन

उखाण्यांचा संग्रह असलेली मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • अनुबंध (हेमलता पंडित)
  • उखाणा घ्या उखाणा (संध्या मुधोळकर)
  • उखाणे (अनुराधा तांबोळकर)
  • उखाणे (प्रतिभा शिराळकर)
  • उखाणे घ्या म्हणी सांगा (मेघना कदम)
  • उखाण्यांची खाण (संकलक - प्रा. उपेंद्र कुलकर्णी)
  • निवडक उखाणे (लता बहिरट)
  • निवडक उखाणे व स्त्रीगीते (उमा प्रकाशन)
  • बंध रेशमाचे (हेमलता य. पंडित आणि विजया बा. कंबागी)
  • बहारदार उखाणे (हेमलता पंडित)
  • सर्वोत्तम उखाणे (विद्या फडके)
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक,७ सप्टेंबर २०२४