उत्तरायण (पतंगोत्सव)

(उतरायण या पानावरून पुनर्निर्देशित)

उतरायण हा भारत देशाच्या गुजरात आणि राजस्थान या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे.[] जानेवारी महिन्यात गुजरात मध्ये दरवर्षी पतांगांचा विशेष उत्सव साजरा केला जातो.[] सुमारे महिनाभर आधी या उत्सवासाठी पतंग तयार करण्याचे काम सुरू केले जाते.[] सूर्याच्या उत्तरायणाचे स्वागत हे या सणाचे वैशिष्ट्य मानले जाते.[]

पतंग दुकानातील तयारी
अहमदाबाद येथील पतंग घेतलेल्या बालिका

स्वरूप

संपादन

या उत्सवातील विशेष खाद्यपदार्थ म्हणून तिळाची वडी, उंधियु म्हणजे तीळाचे वाटण घालून केलेली मिश्र भाजी, तसेच जिलबी हे खास आकर्षण मानले जाते.[] यानिमित्ताने केली जाणारी खिचडी हे ही या सणाचे वैशिष्ट्य आहे.[]

पतंगांचा व्यापार

संपादन

सुरत आणि अहमदाबाद येथे पतंग तयार करण्याचे कारखाने आहेत. विविध व्यापारी वर्षानुवर्षे हे पतंग तयार करण्याचे काम स्थानिक पातळीवर करीत असतात. उत्तरायण काळात पतंगांची विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर केली जाते.[] घरोघरी सहकुटुंब पतंग उडविले जातात तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन पतंगोत्सव साजरा केला जातो.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Uttarayan 2022: Food, kite flying and other traditions of Makar Sankranti". Newsd.in (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Makar Sankranti 2021: Here's Why Gujarat's Uttarayan Festival Is Unique". NDTV.com. 2022-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Kite sellers in Gujarat's Surat expect good sales ahead of Uttarayan festival". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ Desai, Anjali H. (2007). India Guide Gujarat (इंग्रजी भाषेत). India Guide Publications. ISBN 978-0-9789517-0-2.
  5. ^ Taneja, Parina (2022-01-07). "Makar Sankranti 2022: Date, Shubh Muhurat, Important beliefs related to the festival of kites". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Kite sellers in Gujarat's Surat expect good sales ahead of Uttarayan festival". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
  7. ^ Desai, Nikita (2010-06-09). A Different Freedom: Kite Flying in Western India; Culture and Tradition (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. ISBN 978-1-4438-2310-4.