भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात.[१][२] भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.[३]

भोगी

आहारसंपादन करा

यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.[४]

आहारातील महत्त्वसंपादन करा

बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.[५]

स्वरूपसंपादन करा

भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते.[५] या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.[६]त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.[७][८]

 
पोंगल

हे ही पहासंपादन करा

मकरसंक्रांत

ऋषीची भाजी

संदर्भसंपादन करा

  1. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  2. ^ Gupta, C. Dwarakanath (1999). Socio-cultural History of an Indian Caste (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 978-81-7099-726-9.
  3. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-61069-412-4.
  4. ^ Maharashtra (India) (1969). Maharashtra State gazetteers (इंग्रजी भाषेत). Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State.
  5. a b "मकरसंक्रात स्पेशल : जाणून घ्या 'भोगी'चे महत्त्व". आपलं महानगर. १३. १. २०२०. १३. १. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Meliner, Gwenhaël Le (1992). The Pongal Festival in Tamil Nadu (इंग्रजी भाषेत). éditeur inconnu.
  7. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड सहा. भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन.
  8. ^ नवभारत टाईम्स (१०. १. २०१९). "जानें क्या है भोगी पोंगल, किस देवता को समर्पित है यह पर्व". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)