जयवंत दळवी

मराठी लेखक
(ठणठणपाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

जयवंत द्वारकानाथ दळवी (: १४ ऑगस्ट १९२५; - १६ सप्टेंबर १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.

जयवंत दळवी
जन्म नाव जयवंत द्वारकानाथ दळवी
जन्म १४ ऑगस्ट १९२५
हडफडे, गोवा []
मृत्यू १६ सप्टेंबर १९९४
बोरिवली मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, नाटक, विनोदी, संपादकीय, प्रवासवर्णन, लघुकथा
प्रसिद्ध साहित्यकृती सारे प्रवासी घडीचे
वडील द्वारकानाथ
आई काकीबाई

काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले.

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अथांग ? मॅजेस्टिक प्रकाशन
अधांतरी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अंधाराच्या पारंब्या कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अपूर्णांक मॅजेस्टिक प्रकाश
अभिनेता कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अलाणे फलाणे ? मॅजेस्टिक प्रकाशन
आणखी ठणठणपाळ स्तंभलेखन मॅजेस्टिक प्रकाशन
आत्मचरित्राऐवजी आत्मचरित्र मॅजेस्टिक प्रकाशन
आल्बम कादंबरी मॅजेस्टिक
उतरवाट मनोरमा
उपहासकथा कथा मॅजेस्टिक प्रकाशन
ऋणानुबंध कादंबरी मनोरमा
कवडसे कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
कशासाठी पोटासाठी ? मॅजेस्टिक प्रकाशन
कहाणी ? मॅजेस्टिक प्रकाशन
कारभाऱ्याच्या शोधात ? मनोरमा प्रकाशन
कालचक्र नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
कावळे ? मॅजेस्टिक प्रकाशन
किनारा ? मॅजेस्टिक प्रकाशन
कौसल्या ? नवचैतन्य प्रकाशन
घर कौलारू कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
चक्र कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
चक्रव्यूह कादंबरी मनोरमा प्रकाशन
जळातील मासा ? महाराष्ट्र प्रकाशन
दुर्गी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
धर्मानंद
नातीगोती नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
निराळा ? मॅजेस्टिक प्रकाशन
निवडक ठणठणपाळ स्तंभलेख संग्रह
परममित्र मेहता प्रकाशन
पर्याय मॅजेस्टिक प्रकाशन
पुरुष नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
पु.ल. एक साठवण संपादित व्यक्तिचित्रण मॅजेस्टिक प्रकाशन
प्रदक्षिणा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
फजीतवडा विनोदी गं पा. परचुरे प्रकाशन
बॅरिस्टर कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
बाकी शिल्लक कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
बाजार मनोरमा
महानंदा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
महासागर कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
मालवणी सौभद्र परचुरे
मुक्ता ? मॅजेस्टिक प्रकाशन
मिशी उतरून देईन विनोदी परचुरे प्रकाशन
रुक्मिणी ? मॅजेस्टिक प्रकाशन
लग्न ? मॅजेस्टिक प्रकाशन
लोक आणि लौकिक कैलास प्रकाशन
विरंगुळा नवचैतन्य प्रकाशन
विक्षिप्त कथा संपादित कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशन
वेडगळ ? मॅजेस्टिक प्रकाशन
श्रीमंगलमूर्ती अँड कंपनी ? मॅजेस्टिक प्रकाशन
संध्याछाया ? मॅजेस्टिक प्रकाशन
सरमिसळ लघुकथा परचुरे प्रकाशन
संसारगाथा मॅजेस्टिक प्रकाशन
सांजरात ? मनोरमा प्रकाशन
सायंकाळच्या सावल्या मनोरमा प्रकाशन
सारे प्रवासी घडीचे व्यक्तिचित्रे मॅजेस्टिक प्रकाशन
सावल्या प्रवाह कथा मॅजेस्टिक प्रकाशन
सावित्री मॅजेस्टिक प्रकाशन
साहित्यिक गप्पा-दहा साहित्यिकांशी ललित सन प्रकाशन
सुखदुःखाच्या रेषा ? सन प्रकाशन
सूर्यास्त नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
सोनाली कादंबरी मनोरमा प्रकाशन
सोहळा कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
स्त्री पर्व ? मनोरमा प्रकाशन
स्पर्श ? मॅजेस्टिक प्रकाशन
स्व-गत स्वगत मॅजेस्टिक प्रकाशन
स्वप्नरेखा ? मनोरमा प्रकाशन
हरि अप हरि ? मॅजेस्टिक प्रकाशन

चित्रपट कथा / पटकथा

संपादन
  • उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित)
  • चक्र (इ.स. १९८१)
  • रावसाहेब (इ.स. १९८६)
  • कच्चा लिंबू (इ. स. २०१७)('ऋणानुबंध'कादंबरीवर आधारित )

जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका

संपादन
  • चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी)
  • डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी)
  • प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
  • जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध' लेखक : सु.रा. चुनेकर.
  • ’दुःखाची स्वगते’ : दळवी यांच्या १७ कादंबऱ्यांच्या अभ्यासातून घेतलेला शोध (डॉ. संजय कळमकर)
  • पत्ररूप दळवी : दळवी यांच्या पत्रव्यवहाराचे संपादित पुस्तक (संपादक - कृ.ज दिवेकर)
  • बेस्ट ऑफ जयवंत दळवी (संपादित, सुभाष भेंडे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई २००९)
  • 'मॅजेस्टिक प्रकाशन'तर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. २०१५ साली दिलेला २०व्या वर्षाचा पुरस्कार संजय पवार यांच्या ‘ठष्ट’ या नाटकाला देण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या साहित्यकृती :
    • आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी (२०१४)
    • चंदशेखर फणसळकर यांचे 'खेळीमेळी' हे नाटक (२००९)
    • धर्मकीर्ती सुमंत यांचे "गेली एकवीस वर्षे‘ हे नाटक (२०१२)
    • मीना देशपांडे यांची ‘हुतात्मा’ ही कादंबरी (२०११)
    • रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी (२००८)
    • वसंत जोशी यांनी लिहिलेला ‘हास्यजल्लोष’ हा लेखसंग्रह (२०१३)
    • शफाअतखान यांचे ‘शोभायात्रा’ हे नाटक (२००३)
    • सदानंद देशमुख यांच्या....या पुस्तकाला.

संदर्भ

संपादन
  1. ^ (PDF) http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/139415/6/06_abstract.pdf. Text " शोधगंगा" ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

संदर्भ सूची

संपादन