सु.रा. चुनेकर
प्रा. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर (२७ एप्रिल १९३६ – १ एप्रिल २०१९) हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार होते. ते संगमनेर महाविद्यालय येथे तसेच मराठी विभाग, पुणे विद्यापीठात प्राध्यापक होते. एम.ए.च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. त्यांनी विविध ग्रंथ संपादित केले असून अनेक वाङ्ममयीन नियतकालिकांत संशोधनपर व समीक्षात्मक लेखन केले आहे. ते 'मराठी विश्वकोश', 'मराठी वाङमयकोश' यांचे लेखक होते.' मराठी संशोधन पत्रिके'चे ते संपादक होते.[१] शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'दर्शन' या ग्रंथाचे ते मुख्य संपादक होते.[१][२]
साहित्य संशोधनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी 'सूचीनिर्मिती' ही अभ्यासकांसाठी मोठीच सोय असते आणि अशा अनेक सूचींची सूची तयार करण्याचे महत्त्वाचे काम चुनेकर यांनी केले. सुमारे पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी संकलित करून एक मौलिक संदर्भसाहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले.
शिक्षण
संपादन- बी. ए. १९५६ : स.प. महाविद्यालय, पुणे
- एम ए. १९५८ : पुणे विद्यापीठ
- पीएच. डी. १९६३ : पुणे विद्यापीठ
कारकीर्द
संपादन- प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : संगमनेर महाविद्यालय
- प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : मराठी विभाग, पुणे विद्यापीठ
- मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन
लेखन
संपादन- अंतरंग
- जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध
- जी.एं.ची निवडक पत्रे (चार खंड, संपादित, सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
- बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची तसेच समग्र वाङ्मयाची सूची
- माधव ज्युलिअन
- माधव ज्युलिअन (मराठी कवी)
- माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन
- सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर)
- सूचींची सूची
संपादन
संपादन- 'समग्र माधव ज्यूलियन' - संकलन व संपादन (सहसंपादक : प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले)[३]
- सूचीची सूची
- माडगांवकरांचे संकलित वाड्मय (संपादित; सहसंपादक - स.गं. मालशे)
पुरस्कार
संपादन- मुंबई विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचा अ.का. प्रियोळकर स्मृतिपुरस्कार[४]
- राज्य पुरस्कार, १९७४-७५ : माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन या ग्रंथासाठी
संदर्भ
संपादन- ^ a b [["दर्शन" ग्रंथ संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; प्रकाशक : शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर प्रकाशन वर्ष : १९८०, पृष्ठ ४९]]
- ^ Dutt, Kartik Chandra (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. p. 256. ISBN 9788126008735.
- ^ [[१]]
- ^ [[[http://esakal.com/esakal/20090927/5466968332314581685.htm]